Anil Deshmukh 
मुंबई

Anil Deshmukh: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांना भारताचं संविधान भेट दिलं तसेच भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणाही दिल्या.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी चौदा महिने तुरुंगात काढावे लागल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर बुधवारी (दि. २८) बाहेर आले. हायकोर्टानं कोठडी वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळल्यानं त्यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देशमुखांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी देशमुख यांनी संवाद साधला. (Anil Deshmukh first comment after release from Arthur road jail mumbai)

अनिल देशमुख म्हणाले, "सचिन वाझेला दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत अटक झालेली आहे. तीन वेळा त्याला सस्पेंड करण्यात आलं आहे. एनआयएनं त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. त्यामुळं त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. परमबीर सिंग यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं की, "अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप माध्यमांनी दिलेल्या बातम्यांवर आधारित आहेत. त्यांच्याविरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत"

माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, अशा पद्धतीचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांचा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला यासाठी मी त्यांचं मनःपूर्वक आभार मानतो.

तसेच राष्ट्रवादीचे आमचे सर्वैच्च नेते शरद पवार आणि आमचे वरिष्ठ सहकाऱ्यांनी वेळोवेळी यानिमित्तानं पाठींबा दिला आणि सहकार्य केलं यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद, अस यावेळी देशमुखांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

हे ही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांना भारताचं संविधान भेट दिलं तसेच भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणाही दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT