Narayan-Rane 
मुंबई

सीबीआयच्या भीतीपोटीच गृहमंत्र्यांचा राजीनामा- नारायण राणे

विराज भागवत

मुंबई: राज्यात गाजत असलेल्या परमबीर सिंह विरूद्ध अनिल देशमुख या प्रकरणात अखेर आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. या आरोपांवरून आज उच्च न्यायालयाने गृहमंत्र्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. या आदेशानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. या प्रकरणावर भाजप नेते नारायण राणे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

"मुंबईच्या आयुक्तांची बदली झाली. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात आणि उच्च न्यायलयात गेले. आता कोर्टाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे मंत्रिमंडळात भयभीत वातावरण झालं आहे. त्यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होत पण हायकोर्टाने सांगितलं तेव्हा आता सीबीआयसमोर गेल्यावर वस्तुस्थिती सांगावी लागेल या भीतीपोटी त्यांनी राजीनामा दिला आहे.", असं नारायण राणे म्हणाले.

"मंत्रिमंडळातील दोन मंत्री गेले. वर्षभर व्यव्साय चालले नाहीत, पण तरीही कर आकारणी कमी होत नाही. हा सरकारचा जुलूम आहे. यांच्या सगळ्या मंत्र्यांवर आरोप आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जागेसाठी आवश्यक असणारी पात्रता आणि गुणवत्ता उद्धव ठाकरेंच्यात नाही. त्यामुळे त्यांनी आजच राजीनामा देऊन निघून जावं. कारण वाझेचे गॉडफादर उद्धव ठाकरेच होते. वाझे दररोज त्यांना दिवसभरात कोणं गिऱ्हाईक मिळालं याची माहिती द्यायचा", असा खळबळजनक दावा राणे यांनी केला.

"अनिल देशमुखच नाही तर या प्रकरणात अनेक नेतेमंडळी प्रतिक्रिया देणं टाळत आहेत. सचिन वाझोला पोलीस सेवेत घेतलं ते मुख्यंमंत्री सध्या मूग गिळून गप्प का बसलेत... ते या साऱ्या प्रकरणात घाबरलेत का? पोलीस खात्यातील लोकांनी वास्तववादी चित्र उभं केलं. मुख्यमंत्र्याच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. या साऱ्या प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. सचिन वाझेला अटक करायला जाताना त्यांनी अडवलं. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला पोलीसात स्थान दिलं. हे सरकार सत्तेत भ्रष्टाचार करून पैसे कमवायला आलंय की जनतेच्या सेवेसाठी आलं हेच कळत नाही", अशा शब्दात राणेंनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

Baramati Crime News : बारामतीत चोरटयांनी 25 लाखांचे दागिने केले लंपास; अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी चोरटयांचा धुमाकूळ....

SCROLL FOR NEXT