Vulture
Vulture 
मुंबई

गिधाडाचे प्रदर्शन भरवल्याप्रकरणी प्राणिमित्रावर गुन्हा दाखल 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - दुर्मिळ पांढर्‍या पाठीच्या गिधाडाचे चर्चमध्ये प्रदर्शन भरवल्याप्रकरणी प्राणिमित्र प्रदीप डिसुझा यांच्याविरोधात ठाणे प्रादेशिक वनविभागाने गुन्हा नोंदवला आहे. वडाळा येथे मे महिन्यात जखमीअवस्थेत आढळलेले गिधाड रेस्क्यू करत डिसूझा यांनी त्याचा सांभाळ केला होता. याबाबत ठाणे प्रादेशिक वनविभागाने डिसूझा यांना गिधाडाला सांभाळायची परवानगी कोणत्या आधारावर दिली यावरून प्राणिप्रेमीवर्गामध्ये संतापाची भावना आहे.

याआधीही डिसूझा यांच्या घरी ठाणे प्रादेशिक वनविभागाने धाड टाकली होती. त्यावेळी डिसूझा यांच्याकडे विनापरवाना 199 पक्षी आढळले होते. वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या प्राणिमित्राला नामशेष होण्याची भीती असलेल्या पक्ष्याचा सांभाळ करायची परवानगी कोणत्या आधारावर मिळते, असा संतप्त सवाल मुंबई विभागाचे मानद वन्यजीव रक्षक सुनीश कुंजू यांनी केला आहे. चर्चमधील घटनेनंतर ठाणे प्रादेशिक वनविभागाच्या मुंबई टीमने डिसूझा यांच्या घरी धाड टाकली. त्यावेळीहि डिसूझा यांनी विनापरवाना सांभाळण्यास ठेवलेली घारी आणि वटवाघळे आढळून आली. डिसूझा यांना वन्यजीवनाचे नियम ज्ञात असतानाही ते वारंवार नियम तोडत आहेत. आताही डिसूझा यांच्या घरी आढळलेले पक्षी वनविभागाने का हस्तगत केली नाही. या संपूर्ण प्रकरणात डिसूझा यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, गिधाड सांभाळण्याची मूळ परवानगी प्रदीप दिसूझा यांच्या भावाला मिळाली होती. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुंजू यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT