रेल्वे अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना खासदार कपिल पाटील.  
मुंबई

भिवंडीतील अंजूरफाटा चौक कोंडीमुक्त होणार 

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी-ठाणे महामार्गावरील वर्दळीच्या अंजूरफाटा चौकातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता होणार आहे. येथील रेल्वेमार्गाखाली नवा आरयूबी (रेल्वे अंडर ब्रिज) उभारण्यास रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान, येत्या दोन दिवसांत रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. 

भिवंडी-ठाणे महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात असलेल्या गोदामांमुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. येथील वाहतूक व्यवस्थेचे योग्य पद्धतीने नियोजन होत नाही. या मार्गावरून जेएनपीटीहून वसई-अहमदाबाद महामार्गाने जाणारी वाहनेही जातात. त्यातच भिवंडीतील अंजूरफाटा चौक येथे रेल्वेमार्गावरील पुलाखालून केवळ दुपदरी रस्ता आहे.

त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या पार्श्‍वभूमीवर खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मार्गाखालून नवा पूल तयार करावा, अशी मागणी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे सप्टेंबर 2018 ला केली होती. तसेच लोकसभेतही वाहतूक कोंडी व रस्त्यांबाबतचा मुद्दा मांडला होता. 

अखेर रेल्वे मंत्रालयाने नव्या रेल्वे अंडर ब्रिजला मंजुरी दिली. या संदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खासदार कपिल पाटील यांना मंजूर झालेल्या आरयूबीबाबत माहिती दिली. या बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अभियंता लोलगे, डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे सहायक प्रकल्प व्यवस्थापक झेवियर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परदेशी आदी उपस्थित होते. शहरातील अंजूरफाटा येथील आरयूबीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. 

रहिवाशांसह वाहनचालकांना दिलासा 
अंजूरफाटा येथे रेल्वे अंडर ब्रिजमुळे नेहमीच ठप्प असलेल्या अंजूरफाटा चौकातून वाहनचालकांना लवकर बाहेर पडता येईल; तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अंजूरफाटा येथे दोन कोटी रुपये खर्चून कॉंक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. या दोन्ही कामांसाठी खासदार पाटील यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. या कामांमुळे हा चौक वाहतूक कोंडीमुक्त होण्याची शक्‍यता असून, या भागातील रहिवाशांसह वाहनचालकांना मोकळा श्‍वास घेता येईल. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT