maharashtra assembly
maharashtra assembly 
मुंबई

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; बॉम्बशोधक पथक दाखल

कार्तिक पुजारी

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झालंय.

मुंबई- मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झालंय. मंत्रालयातील कंट्रोल रुमला एका अज्ञाताने फोन करुन बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. फोन आल्यानंतर खबरदारी म्हणून मंत्रालयातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. एका मराठी माध्यमाने यासंदर्भातील वृत्त दिलंय. या फोनमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Anonymous phone call to bomb the maharashtra ministry police mumbai)

रविवारचा दिवस असल्याने मंत्रालयात जास्त दर्दी नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात आलेल्या फोनमध्ये परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर तत्काळ बॉम्बशोधक पथकाला प्राचारण करण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराच हा फोन आला होता. रविवारची सुट्टी असल्याने कर्मचारी मंत्रालयात उपस्थित नाहीत. सध्या बॉम्बशोधक पथक मंत्रालय परिसराचा कसून तपास करत आहे. श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली आहे. असे असले तरी नेमकं कोणी फोन केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT