central railway sakal
मुंबई

Central Railway : मध्य रेल्वेवर उभारण्यात येणार आणखी एक नवीन उपनगरीय लोकल स्थानक

मध्य रेल्वे मार्गावरील अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान चिखलोली हे नवे स्थानक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ८१.९३ कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान चिखलोली हे नवे स्थानक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ८१.९३ कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. स्थानकांच्या उभारण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)कडून निविदा काढल्या आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर ४० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. मुंबई शहराच्या तुलनेत ठाणे, कल्याण, डोबिंवलीसह इतर स्थानकांमधील दैनंदिन प्रवाशांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकावरील प्रवाशांच्या गर्दी गेल्या काही वर्षांपासून प्रचंड वाढली आहे.

त्यामुळे अंबरनाथ-बदलापूर दरम्यान चिखलोली स्थानक उभारण्याची मागणी प्रवासी आणि स्थानिक लोकप्रतिनिधीकडून करण्यात आली होती. तसा प्रस्तावही २०२० मध्ये रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याला मजुरी मिळाली होती. आता या स्थानक उभारण्याचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)कडून करण्यात आली आहे.

स्थानकाच्या उभारणीसाठी एकूण ८. ५० एकर जमीन संपादित करण्यात आली आहे,. आता चिखलोली स्थानकांच्या उभारण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)कडून निविदा काढल्या आहे. या स्थानकात चार फलाट बनवण्यात येणार असल्याची माहिती एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दोन वर्षात काम पूर्ण होणार

चिखलोली परिसरातील रहिवाशांची जास्त काळ गैरसोय होऊ नये म्हणून पुढील दोन वर्षात स्थानक उभारण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले असून त्यासाठी आर्थिक निधीही मुबलत मिळवून दिला आहे. चिखलोली स्थानकामुळे अंबरनाथ-बदलापूर स्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन करण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

SCROLL FOR NEXT