sameer wankhede esakal
मुंबई

आणखी एका साक्षीदाराची पलटी, समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या

वानखेडेंनी आपल्याला आश्वासन दिले. त्याने WhatsApp कॉल रेकॉर्डही दाखवले.

दीनानाथ परब

मुंबई: NCB अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. ड्रग्ज प्रकरणात त्यांच्या तपासावर, धर्मावरुन विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असताना आता आणखी एका साक्षीदाराने पलटी मारली आहे. प्रभाकर साईल नंतर खारघर ड्रग्ज प्रकरणातील (drug case) साक्षीदार शेखर कांबळे (Shekhar Kamble) याने कोऱ्या कागदावर NCB च्या अधिकाऱ्यांनी आपल्या स्वाक्षरी घेतल्या, असा दावा केला आहे.

खारघरमध्ये ड्रग्ज प्रकरणात एका नायजेरियन आरोपीला अटक करण्यात आली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी १० ते १२ कोऱ्या कागदांवर माझी स्वाक्षरी घेतली. नंतर तेच कागद पंचनाम्यासाठी वापरले, असे शेखर कांबळे यांनी म्हटले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

"काल टीव्हीवर मी खारघर नायजेरियन प्रकरणाची बातमी बघितली. मला भिती वाटली. अनिल माने, आशिष रंजन आणि एनसीबी अधिकाऱ्यांचा मला फोन आला. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. काल रात्री उशिरा एनसीबी अधिकारी अनिल माने यांनी मला फोन केला व कोणाकडेही याबद्दल वाच्यता करु नको" असे सांगितले.

"समीर वानखेडेंनी आपल्याला कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करायला सांगितली होती" असा दावा शेखर कांबळे यांनी केला. काहीही होणार नाही, असे वानखेडेंनी आपल्याला आश्वासन दिले. त्याने WhatsApp कॉल रेकॉर्डही दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT