Drugs
Drugs Sakal
मुंबई

मुंबईत २१ कोटींचे ड्रग्स जप्त, एका महिलेला अटक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) सक्रीय असून अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी ((anti narcotics cell)) पथकाने सायन (sion mumbai) परिसरात छापे टाकून जवळपास २१ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे. तसेच एका ड्रग्स तस्कर महिलेला अटक देखील करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात एनसीबीने मोठी कारवाई करत मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर कारवाई केली होती. क्रूझवर ड्रग्स पार्टी सुरू होती. तसेच याठिकाणाहून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना अटक करण्यात आली होती. अद्यापही आर्यन खानची सुटका झालेली नसून त्याला ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर एनसीबीने मुंबईत ठिकठिकाणी कारवाई केली. त्यामध्ये अनेक ठिकाणी ड्रग्स आढळून आले आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने सायन परिसरात छापेमारी करत २१ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले. यामध्ये ७ किलो हेरॉईनचा समावेश असून अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वात घाटकोपर युनिटने ही कारवाई केली आहे.

८ ऑक्टोबरलाही केली होती कारवाई -

डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर छापा टाकला होता. यावेळी एका कंटेनरमध्ये तब्बल २५ किलोहून अधिक हेरॉइन आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी हे ड्रग्स जप्त केले होते. तसेच या ड्रग्सची किंमती १२५ कोटी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT