मुंबई

सर्वात मोठी बातमी : धमकीचा मोबाईल सापडलेल्या सोनूचा दादर स्फोटांमध्ये सहभाग

अनिश पाटील

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याची जबाबदारी स्विकारणारा जैश-उल-हिंद या संघटनेच्या नावाने आलेला टेलिग्राम संदेश हा तिहार कारागृह परिसरातून आल्याचे सायबर तपासणीत निष्पन्न झाले होते. हा मोबाईल आता इंडियन मुज्जाहिदीन या संघटनेसाठी काम केलेला दहशतवादी तहसीन अख्तर उर्फ सोनू हा सध्या तिहार जेलमध्ये असून त्याच्याजवळ हा मोबाइल सापडला आहे. तहसीन हा दुसरा तिसरा कोणी नसून 2011 मध्ये दादर स्फोटांपासून त्याने दहशतवादी कारकिर्दीला सुरूवात केली होती.

'तिहार च्या बराक 8 मध्ये सोनूला ठेवण्यात आलं होतं. हा फोन आता न्याय वैद्यक प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं कळतेय. गुप्त माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कारागृह अधिक्षक पथकाने तिहारमध्ये शोध मोहिम राबवली. त्यावेळी हा फोन सोनूजवळ आढळला. याच सोनूला इंडियन मुजाहिदीनचा तत्कालीन प्रमुख यासिन भटकलने जुलै,2011 मध्ये मुंबईत बोलवले होते.

दादर येथे आयईडी ठेवण्याची जबाबदारी तहसीनवर सोपवण्यात आली होती. त्यावेळी यासिन भटकल स्वतः दादरमध्ये उपस्थित होता. त्यानंतर 2013 मध्ये हैद्राबादमध्ये झालेल्या स्फोटांमध्येही तहसीनचा सहभाग होता. वकास ऊर्फ हड्डी व तहसनी या दोघांनी दिलसूख नगर येथील घटनास्थळी आयईडी ठेवले होते. त्यानंतर सोनू तेथून जयपूरमध्ये पळाला. जोधपूरमध्येही तो वास्तव्याला होता. तेथे इंडियन मुजाहिदीनच्या राजस्थान मॉड्यूलच्या तो संपर्कात होता. यासिन भटकळच्या अनुपस्थितीत तहसीनच इंडियन मुजाहिदीन चालवत होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिली.

याप्रकरणी गुरूवारी दिल्ली विशेष सेलने तिहार जेलमध्ये शोध मोहिम राबवली. त्यात प्राथमिक पडताळणीत हा क्रमांक तिहार जेलमधूनच वापरण्यात आल्याचे पुढे आले आहे. हा क्रमांक दिल्लीतील राहुवर पुरा येथील जयदिप लोढीया नावाच्या व्यक्तींच्या नावावर असून याच क्रमांवरून जैश-उल-हिंद या संघटनेच्या नावाने आलेला टेलिग्राम संदेश पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या पडताळणीत स्पेशल सेलचे पथक तेथील बराक क्रमांक 8 पर्यंत पोहोचले असून त्यात इंडियन मुजाहिद्दीन, अल कायदा आणि अंडरवर्ल्डशी संबंधित आरोपी ठेवण्यात आले आहेत. त्या तपासात पुढे सोनूकडे हा मोबाईल सापडला.

पिक्चर अजून बाकी आहे, अशा शब्दात या संघटनेच्या वतीने जारी करण्यात आली होती. एका टेलिग्राम मेसेजच्या माध्यमातून जैश-उल हिंदने दावा केला होता. त्यात स्फोटकं ठेवणारे दहशतवादी सुखरुपपणे घरी पोहोचले आहेत. हा केवळ ट्रेलर होता आणि पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. यात मुकेश अंबानी यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी देण्यात आलेली बिटकाईनची लिंक बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते.  या संदेशानंतर सायबर तज्ज्ञांच्या मदतीने या टेलिग्राम संदेशाची तपासणी करण्यात आली असून तो तिहार कारागृह आणि आसपासच्या परिसरातून पाठवण्यात आल्याचे तांत्रिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. सुरुवातीला संबंधित संदेश हरीनगर परिसरातून आल्याचा संशय होता. पण आता या संदेशाबाबतचा तपास तिहार कारागृहापर्यंत पोहोचला. 

antilia bomb scare important information revealed about mobile and owner of mobile found in tihar jail  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT