antilia explosive case sakal media
मुंबई

अँटिलिया स्फोटक प्रकरण; NIA ने केलेल्या 'त्या' याचिकेवरील निकाल ठेवला राखून

सुनिता महामुनकर

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात (Antlia Explosive case) आरोपी असलेल्या क्रिकेट बुकि नरेश गोरच्या (cricket bookie naresh gaur) जामिनाविरोधात एनआयएने (NIA) केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल (Petition result pending) राखून ठेवला आहे. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणात (Mansukh Hiren murder case) आरोपी असलेल्या गोरला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयाला एनआयएने याचिकेद्वारे उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले आहे.

न्या नितीन जाधव आणि न्या सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज सुनावणी पूर्ण झाली. गोर या प्रकरणात महत्वाचा आरोपी आहे आणि त्याच्यावर कटकारस्थानात सहभागी असल्याचा आरोप आहे, त्यामुळे त्याला जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनील सिंह यांनी केला आहे. गोरने प्रमुख आरोपी सचिन वाझेला बेनामी सिम कार्ड पुरविल्याचा आरोप आहे. ही कार्ड भुजवरुन बेनामी व्यवहार करुन आणण्यात आली होती असे सिंह यांनी सांगितले.

या आरोपांचे खंडन गोरच्या वतीने वकील शिरिष गुप्ते आणि एड अनिकेत निकम यांनी केले. केवळ सिम कार्ड पुरवली म्हणून कटकारस्थानात सहभाग होऊ शकत नाही, त्यासाठी एकत्र भेटल्याची माहिती हवी, सिम कार्ड दिल्याचा तपशील हवा, असा युक्तिवाद गुप्ते यांनी केला. भुजवरुन चौदा सिम कार्ड आणण्यासाठी त्याला पाठविले होते, त्यापैकी नऊ कार्ड वापरले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. खंडपीठाने सुनावणी पूर्ण केली असून निकाल ता. 21 पर्यंत राखून ठेवला आहे. वाझे या प्रकरणात अटकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT