मुंबई

Sachin Waze Case: पोलीस अधिकारी रियाझ काझीला अटक; NIAची कारवाई

विराज भागवत

मुंबई: सचिन वाझेचे सहकारी पोलीस अधिकारी रियाझ काझी याला रविवारी NIAने अटक केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी सर्वप्रथम सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर NIAने पोलीस अधिकारी रियाझ काझीला अनेकदा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तशातच स्फोटकांच्या कटात सामील असणे आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणे या आरोपांखाली सचिन वाझेचा सहकारी रियाज काझीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या कटामध्ये रियाझ काझीही सामील होता अशी शंका NIA ला सुरूवातीपासूनच होती. म्हणूनच सचिन वाझेला ताब्यात घेतल्यानंतर काही दिवसांतच रियाझ काझीला चौकशीसाठी बोलवलं गेलं. त्याची वारंवार चौकशी करण्यात येत होती. CIU चे प्रमुखपद वाझेकडे होते आणि रियाझ हा देखील CIUचा अधिकारी असल्याने त्याच्यावर NIAला संशय असल्याचं समजलं होतं. अखेर रविवारी NIAने रियाझ काझीला कटात सहभागी असणे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न व मदत केल्याप्रकरणी अटक केली. रियाझ काझीसह CIU मधील अनेक अधिकाऱ्यांची NIAकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे आणखी अधिकारी या कटात सामील होते की नाही याबद्दल चर्चा आहे.

कोण आहे  रियाझ काझी?

API रियाझुद्दीन काझी 102 बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. 2010 मध्ये त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांची पोलीस भरती झाली. त्यांचे पहिले पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये PSIच्या पोस्टवर झालं होतं. तेथे त्यांनी प्रोबेशन पीरियडवर काम केले. वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये काही वर्षे काम केल्यावर त्यांची अँटी चेन-स्नॅचिंग स्कॉडमध्ये बदली करण्यात आली. त्यानंतर रियाझुद्दीन यांची थेट CIU मध्ये बदली झाली. अँटिलिया स्फोटक प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा संशय बळावताच त्यांची बदली LA मध्ये करण्यात आली.

अखेर रविवारी रिजाझला पुरावे नष्ट करणे, तसेच गुन्हा घडत असल्याची माहिती असतानाही त्यात सहभागी होण्याच्या आरोपाखाली NIAने अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मराठी अभिनेत्रीसोबत एका रात्रीसाठी २ लाख; मुंबईत हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; समोर आली धक्कादायक माहिती

Property Tax : कर सवलतीची आजच संधी; मिळकतकर थकबाकीदारांवर उद्यापासून जप्तीची कारवाई

Latest Marathi News Live Update : जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित बनावट सहीप्रकरणी मोठी कारवाई; चामोर्शी नगरसेवकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Vat Purnima Heart Attack Death : पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजला वटवृक्ष; वाण देतानाच आला हृदयविकाराचा तीव्र झटका, सिंधुदुर्गातील 'या' सावित्रीचा दुर्दैवी अंत

Kas Plateau Flower Season : पर्यटकांसाठी मोठी अपडेट! कास पठारावर फुलांचा हंगाम कधीपासून सुरू होणार? यंदा काय असणार खास? वनविभागाची पूर्वतयारी सुरू

SCROLL FOR NEXT