Anupam Kher interacts with CISF jawans at mumbai chembur
Anupam Kher interacts with CISF jawans at mumbai chembur 
मुंबई

अनुपम खेर यांनी जिंकली CISF च्या जवानांची मने

दिनेश चिलप मराठे

मुंबादेवी : मुंबई चेंबूर येथे CISF च्या 50 व्या स्वर्ण जयंतीचे औचित्य साधत 19 जुलै ला झालेल्या मोटिवेशन प्रोत्साहन संभाषण कार्यक्रमात उपस्थित राहून वरिष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी उपस्थित जवान आणि अधिकारी वर्गाची खुसखुशित संवाद साधत मने जिंकली. सर्वात महत्वाचे म्हणजे अनुपम खेर यांनी जवानांत मिसळत त्यांच्याशी जवळीक साधत गप्पा मारल्या. या खास कार्यक्रमांचे निमित्त होते. ते केंद्रीय औदयोगिक सुरक्षा दलाच्या 50 व्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त आयोजित मोटिवेशन स्पीचचे.

ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले... असे अनुपम खेर यांच्या आगमनानाने नवचैतन्य सळसळलेल्या उत्साही जवानांबाबत घडले. 335 पेक्षा जास्त केंद्रीय आस्थापनांची सुरक्षा व्यवस्था राखणारी दीड लाखांवरील या शिस्तबद्ध फौजेत कर्तव्य बजावणाऱ्या या जवानांना पाहुन मनाला आनंद होतो आणि देश प्रेमाचे भरते येते असे खेर म्हणाले. CISF च्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक सतीश खंदारे, डेप्युटी निरीक्षक संजय कुमार, वरिष्ठ कमांडर शिप्रा श्रीवास्तव उपस्थित होते.

आपल्या लहानपणाच्या काही मजेशिर किस्से आणि गमती जमती सांगताना त्यांनी सभागृहातील उपस्थितांच्या मनाला मोहिनी घालीत सर्वांना खिळवून
हसविले.

मित्रांनो, मी फारच छोट्या शहरात जन्मलो, काम धंदा नव्हता. बाबा लिपिक होते. घरात आई, बाबा, ताया, नाना आदी कुटुंब होते. बाबांना 90 रु पगार होता. तरीही 14 लोकांचे घर गरीबीत आनंदात चालायचे. गरीबीची लाज,  दुःख नव्हते आनंदी होतो. एक दिवस आजोबाना प्रश्न विचारला की आपण गरीब का आहोत तरीही आपण आनंदी का आहोत?.त्यावर त्यांनी सुंदर उत्तर दिले ते म्हणाले बेटा माणूस जेव्हा गरीब असतो तेव्हा आनंद हाच सर्वात स्वस्त असतो आणि तो आपाल्याकडे आहे. म्हणून आपण आनंदी आहोत. तुम्ही जवान अधिकारी नेहमी आनंदात राहा. भारत मातेची सेवा करत आहात हे तुमचे आनंदी भाग्य आहे.

आपण हसायचे की नाही, टाळ्या वाजवायच्या की नाहीत यांचे विचार करत बसु नका. तात्काळ व्यक्त व्हा. वर्दीवाला जवान त्यास कुटुंबिय, मनो भावना असतात त्याचा लोक विचारच करीत नाही. मला डोक्यावर केस नाहीत तसेच काहीजण येथेही आहेतच, टकलू (हश्या -टाळ्या). मी शाळेत 38 टक्के मार्क मिलवायचे. खेळात ही कमजोर होतो. नेहमी शेवटच्या खेळाडुशी स्पर्धा असायची. टीचर म्हणायचे की तू एकटाच धाव म्हणजे पहिला येशील.
त्यांनी भारत माताकी जय असा जयघोष व्हायलाच हवा. ऐसा आग्रह धरला. 
तुम्हाला एअरपोर्ट वर चेकिंग करताना पाहिले की फार आनंद होतो. तुम्हाला जादू की झप्पी द्याविशी वाटते. एक शिस्तबद्ध फोर्स असल्याने तुम्ही सदैव नियमात असतात. कधी कधी वेळ मिळाल्यास हसत खेळत मस्करी करीत आंनद मिळवा, असा सल्ला जवानांना दिला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT