Anvay-Naik-Daughter-Wife 
मुंबई

रश्मी ठाकरेंसोबत जमिनीचा व्यवहार; अन्वय नाईक कुटुंबाचं भाजपला थेट आव्हान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई:- अन्वय नाईक यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी एका जमिनीचा व्यवहार झाला होता. या प्रकरणाचा संदर्भ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेशी जो़डत काही भाजप नेत्यांनी सरकारवर टीका केली होती. याबद्दल आज नाईक कुटुंबीयांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, सातबाऱ्यांचाच मुद्दा असेल तर सर्व मंत्र्यांनी त्यांचे सातबारा काढावेत, आम्ही आमच्या बँक खात्यांची माहिती देतो. आता 'चाय पे चर्चा' होऊनच जाऊ दे, असं खुलं आव्हान नाईक कुटुंबीयांनी भाजपा नेत्यांना दिलं.

"जमीनीचा व्यवहार कायदेशीर पद्धतीने करण्यात आला होता. अन्वय नाईक हे आर्किटेक्ट होते. जमिनीचे व्यवहार करणे हा त्यांचा व्यवसाय होता. जमिनीची खरेदी विक्री करणे हा गुन्हा आहे का? त्यातही भाजपाचे नेते मुद्दाम आठ-दहा वर्षांपूर्वीचे प्रकरण उकरून त्याचा संबंध या प्रकरणाशी जो़डत आहेत. ही बाब कितपत योग्य आहे. इतकीच शंका असेल तर माझ्या वडिलांकडून जमिनी विकत घेणाऱ्या सर्व मंत्र्यांनी त्यांचे सातबारा काढावेत. मी आम्हीदेखील आमच्या बँक खात्यांची माहिती समोर ठेवतो. मग चाय पे चर्चा होऊनच जाऊ दे", असं नाईक कुटुंबीयांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

"अर्णब प्रकरणात तिघांना अटक झाल्यानंतर मुद्दाम रश्मी ठाकरे यांनी खरेदी केलेल्या जमिनीचा मुद्दा चर्चेत आणण्यात आला. खरं पाहता या दोन बाबींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. जमीन खरेदी केलेल्या लोकांना आणि आरोपींनाही ही बाब माहिती आहे. असं असतानाचा भाजपा नेते किरिट सोमय्यांचा जीव का वर खाली होतोय? आम्ही आमचा माणूस गमावला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना शिक्षा होणार हे दिसतंय. त्यामुळे या बाबींचा मुद्दाम संबंध जो़डला जात आहे. पण या प्रकऱणात किरिट सोमय्या इतका रस का घेत असावेत? हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही", असा टोलाही त्यांनी सोमय्यांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT