मुंबई

वरळीमध्ये एक अपार्टमेंट 42 कोटीला, लक्झरी फ्लॅटच्या खरेदीत तेजी

मिलिंद तांबे

मुंबई: लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या ही महिन्यात रियल इस्टेट उद्योग आर्थिक संकटात सापडले होता. मात्र कोविड संसर्ग कमी होताना गृहनिर्माण क्षेत्र पुन्हा जोमाने उभारी घेत असल्याचे चित्र आहे. यामध्ये विशेषता लक्झरी फ्लॅट्स खरेदीचे प्रमाण वाढले आहे. नुकताच वरळी भागात एक आलिशान फ्लॅट तब्बल 42 कोटी रुपये मोजून खरेदी करण्यात आला.  कोविड काळातील घर खरेदीमधील ही महागडी डील असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. यापूर्वी एका उद्योगपतीने वरळी भागात 76 कोटीला दोन फ्लॅट खरेदी केले होते. 

गेल्या दोन महिन्यांपासून लक्झरी सदरातील घर खरेदीला वेग आलाय. किंबहुना लॉकडाऊन काळातही या सेगमेंटमधील घरे विकली जात होती. वरळी भागात एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष आणि सीईओ अर्नाझ मिस्त्री यांनी 41.23 कोटी रुपये मोजून एक अपार्टमेंट खरेदी केली आहे. के रहेजा यांच्या आर्टेशीया या गृहनिर्माण प्रकल्पातील 35 व्या माळ्यावर हे अपार्टमेंट आहे. 18 नोव्हेंबरला हा सौदा पक्का झाला. या फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ 8,132 चौरस फूट एवढे आहे. या फ्लॅटसाठी जवळपास 96 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी मोजण्यात आली आहे. अर्नाझ मिस्त्री यांना या फ्लॅटसोबत एकूण आठ पार्कीग जागा  मिळाल्या आहेत. या फ्लॅटची एकूण खरेदी 44 कोटी 57 लाख पडली आहे. यापूर्वी प्रसिध्द बँकर्स रोमेश सोबती यांनी वरळीमध्ये 76 कोटी रुपयांमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते.

 तयार लक्झरी फ्लॅटच्या खरेदीला चांगली मागणी आहे. जीएसटी आणि मुद्रांक शुल्क सवलतीमुळेही घर खरेदी होत असल्याचे नरडेकोचे राज्य अध्यक्ष अशोक मोहनानी यांनी म्हटलं आहे.

यापूर्वीच्या मोठ्या घर खरेदी डील

  • ऑक्टोबर महिन्यात अनुराग जैन यांनी 1.22 लाख प्रति चौरस फूट या दराने कर्मिशयल प्रोजेक्टमध्ये अपार्टमेंट खरेदी केली.
  • यापूर्वी जुलै महिन्यात त्यांनी 1.56 लाख प्रति चौरस फूट या दराने इथेच अपार्टमेंट घेतली होती.
  • जुलै महिन्यात वांद्राच्या नवरोज बिल्डींगमध्ये सुशीलकुमार जैन यांनी 1.30 लाख  रुपये प्रति चौरस फुटाने अपार्टमेंट घेतली.
  • प्रतिक अग्रवाल यांनी समुद्र महल येथे 1.12 लाख रुपये प्रति चौरस फूट या दराने फ्लॅट खरेदी केला.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

An apartment in Worli for Rs 42 crore a boom in the purchase of luxury flats

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT