गणेशाेत्‍सवाच्‍या खरेदीसाठी लगबग 
मुंबई

गणेशोत्सवात गावातच खरेदी करण्‍याचे समृद्ध कोकण संघटनेचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

पोलादपूर (बातमीदार) : गणेशोत्सव काही दिवसांवरच आला आहे. शहरात राहणारे कोकणीवासी यानिमित्त कोकणात दाखल होतात. सोबत शहरातूनच साहित्य आणि सामानही घेऊन येतात. याच मंडळींनी जर शहरातून खरेदी करण्याऐवजी गावातच खरेदी केली, तर कोकणाची उलाढाल वाढून अनेक व्यावसायिकांना रोजगार मिळेल. यासाठी जिल्ह्यातील नोकरदारांनी एकजूट होणे गरजेचे आहे, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांना करण्यात येत आहे.

कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव व शिमगोत्सव साजरा होतो. गणेशोत्सव काळ म्हणजे समस्त कोकणवासीयांसाठी आनंदोत्सवाची पर्वणीच असते. ओसाड पडलेली गावे गणेशोत्सवाच्या काळामध्ये सात दिवस भरून जातात आणि सर्वत्र आनंदाला उधाण येते. या वेळी दाखल होणारे कोकणवासी गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य व सामान हे शहरातून येताना सोबत घेऊन येतात. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना त्यांच्या येण्यामुळे फारसा फायदा होत नाही. मात्र, हीच खरेदी चाकरमान्यांनी चार-दोन रुपयांचा विचार न करता गावी करावी, जेणेकरून या उत्सवात मोठी उलाढाल कोकणामध्ये होईल. यामुळे थंडावलेली व्यावसायिकांची मरगळ झटकली जाईल आणि अनेक व्यावसायिकांना रोजगार मिळेल. या संदर्भात समृद्धी कोकणच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांना आवाहन करण्यात आले आहे. 

ही पोस्ट समृद्ध कोकण संघटनेचे सदस्य सचिन मेहता यांनी तयार केली. त्यानंतर समृद्ध कोकण संघटनेचे प्रणेते व नेते यांनी ही पोस्ट उचलून धरून हजारोंच्या संख्येने कोकणस्थ नोकरदारांकडून व्हॉट्‌सॲप व फेसबूकच्या माध्यमातून शेअर करण्यात येत आहे. मोठ्या वेगाने ती पोस्ट सर्वत्र आता फिरत असल्याने शहरात राहणारे कोकणवासी कोकणातच खरेदी करण्याची शक्‍यता वाढली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT