मुंबई

मरकजला गेला असाल तर तत्काळ पोलिसांना माहिती द्या, नाहीतर... वाचा सविस्तर बातमी

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजला गेलेल्या व्यक्तींनी मुंबई महापालिकेशी 1916 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. माहिती न देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे. 

तबलिगी जमातीने गेल्या महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथे आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमाला देशभरातून हजारो लोक उपस्थित होते. या कार्यक्रमात सहभागी झालेले लोक देशभरात विखुरले असून, अनेकांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ झाल्याची शक्‍यता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला गेलेल्या नागरिकांनी मुंबई महापालिकेला 1916 क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ही माहिती न देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 500 वर जाऊन पोहोचला आहे. काही दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मरकजला गेलेले अनेक जण मुंबईत आले असून, त्यांचा अनेकांशी संपर्क आला आहे. संसर्ग अधिक वाढू नये यासाठी महापालिका आणि राज्य सरकारकडून संसर्गित लोकांचा शोध सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर मरकजला गेलेल्या व त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांपासून इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी त्यांचा शोध घेऊन विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : 'भारतासाठी ही स्थिती चिंताजनक, युद्ध थांबले नाही तर देशावर त्याचे गंभीर परिणाम होणार'; PM नरेंद्र मोदी यांचा इशारा

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; युद्धस्थिती शमल्याचा परिणाम

Latest Marathi News Live Update : रुपाली पाटील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Dhurandhar Movie Controversy: बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ आता कायद्याच्या रडारवर; बंदी घालण्याची मागणी

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

SCROLL FOR NEXT