मुंबई

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालक पदी नियुक्ती 

अनिश पाटील


मुंबई -  राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल केंद्रात प्रतिनियुक्तीवर  जाणार आहेत.सीआयएसएफ च्या महासंचालकपदी नियुक्ती त्यांना नियुक्ती देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिका-यांमध्ये मोठ्याप्रमाणात खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 
 भारतीय पोलीस सेवेतील 1985 च्या बॅचचे अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल हे यापूर्वी रॉ मध्ये दिल्लीत होते. मात्र दत्ता पडसलगीकर यांचा पोलीस आयुक्त पदाचा  कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर फडणवीस सरकारने सुबोधकुमार जयस्वाल यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणुन नियुक्ती केली. तर त्यानंतर पडसलगीकर हे पोलीस सेवेतुन कायर्यमुक्त होताच, त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यातच 2019 मध्ये  झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी बनवून राज्यात सरकार बनवले.  त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीतून जयस्वाल यांना केंद्रीय यंत्रणेवर प्रतिनियुक्तीबाबत हिरवा सिग्नल मिळाला होता.मात्र जयस्वाल यांनी त्यावेळी नकार दिला होता.

मात्र कोरोना काळात राज्य सरकारने जीआर काढून 15 टक्के बदल्याना परवानगी दिली. मात्र जयस्वाल यांचे कोरोना काळात बदल्यांबाबत वेगळे मत होते. अशातच जयस्वाल यांनी केंद्रात जाण्यासाठी  पुन्हा राज्य सरकारकडे परवानगी मागितली,होती. यावेळी  राज्य सरकारने जयस्वाल यांना दिल्ली जाण्यास परवानगी दिली होती.  

पोलीस महासंचालक पदासाठी जोरदार रस्सीखेच
 सुबोधकुमार जयस्वाल केंद्रात गेल्यामुळे त्यांच्या रिक्त होणा-या जागेवर जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. यामध्ये संजय पांडे, बिपीन बिहारी, हेमंत नगराळे, सुरेंद्र पांडे, कनकरत्म आणि रजनिश सेठ यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र यामध्ये  संजय पांडे, नगराळे आणि रजनिश सेठ यांची नावे आघाडीवर मानली जात आहेत.  संजय पांडे यांचे नाव या स्पर्धेत काहीसे आघाडीवर मानले जाते. या बदलानंतर राज्यात मोठ्याप्रमाणात खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही महत्त्वाच्या शहरांमधील पोलिस आयुक्त पदांवरही नवे अधिकारी येण्याची शक्यता आहे.

Appointment of Director General of Police Subodh Kumar Jaiswal as Director General of CISF

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

SCROLL FOR NEXT