Balasaheb_Thorat 
मुंबई

एप्रिल महिना धोक्याचा, सर्वांनी काळजी घ्या - बाळासाहेब थोरात

सकाळ डिजिटल टीम

एप्रिल महिना हा कोरोनाच्या संसर्गाबाबत अधिक धोक्याचा असेल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे, याचाच पुनरुच्चार करताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 
 
थोरात म्हणाले, "एप्रिल महिना आपल्यासाठी खूपच काळजीचा असणार आहे याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळझी घ्या, जनतेचीही काळजी घ्या. आपल्याला लॉकडाउन टाळायचा आहे, त्यामुळे कडक निर्बंध लादण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. येत्या काही तासांत याची नियमावली जाहीर केली जाईल. 

कडक निर्बंध म्हणजे?

कडक निर्बंध याचा अर्थ लोकांनी कमीत कमी प्रमाणात एकत्र येणं असा आहे. त्यामुळे दुकानं, हॉटेलं आणि अनावश्यक गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीकेंड म्हणजेच शनिवार-रविवार या दोन दिवशी लोक एकत्र येतात, घराबाहेर पडतात, यामुळे प्रादुर्भाव वाढण्यात मदत होते. त्यामुळे वीकेंडच्या या दोन दिवशी कडक निर्बंध लादावेत अशी आमची बैठकीत चर्चा झाली आहे.  

लॉकडाउनचे मोठे दुष्परिणाम

पहिल्या लॉकडाउनमध्ये लोकांचा रोजगार गेला, उत्पन्न थांबलं, लॉकडाउनचे खूप मोठे दुष्परिणाम पहायला मिळाले. त्यामुळे आता आपण कडक निर्बंध आपण लागू करत आहोत. मात्र, शेवटचा पर्याय हा लॉकडाउन असतो हे विसरुन चालणार नाही. कडक निर्बंध लागू करताना लोक कुठेही अडकून पडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असंही थोरात यांनी सांगितलं. 

ग्रामीण भागात गाव प्रमुखांवर नियंत्रणाची जबाबदारी 
 
ग्रामीण भागातही फोफावणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाबाबत गावातील प्रमुख लोकांनी नियंत्रण मिळवण्याबाबत काळजी घ्यायची आहे. यामध्ये लग्न समारंभांतील संख्येचा मोठा परिणाम होतो त्यामुळे या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे, अशी अपेक्षाही थोरात यांनी व्यक्त केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT