ArcelorMittal Nippon company proposed to state government to set up factory investing eighty thousand crore  sakal
मुंबई

Mumbai News : ऐंशी हजार कोटींची गुंतवणुक अर्सेलर मित्तल राज्यात करणार

तळकोकणात त्यांना एक हजार एकर जमीन देण्याची तयारी सरकारने दाखविली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अर्सेलर मित्तल निप्पॉन या स्टीलनिर्मिती कंपनीने राज्यात आणखी ऐंशी हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून कारखाना उभारणीचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला. त्यानुसार तळकोकणात त्यांना एक हजार एकर जमीन देण्याची तयारी सरकारने दाखविली आहे.

या विस्तारामुळे राज्यात प्रत्यक्ष शेकडो नवे रोजगार व हजारो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.

कंपनीचे राज्यात अनेक ठिकाणी स्टील उत्पादन प्रकल्प आहेत व त्याचा विस्तार करण्याची कंपनीची इच्छा आहे. त्यानुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर त्यांना जागा देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.

विस्तारासाठी कंपनीला पाच हजार एकर जमीन हवी आहे, तसेच वांद्रे-कुर्ला व्यापारी संकुलात कार्यालयासाठीदेखील कंपनीने जागा मागितली आहे. विस्तारासाठी बंदराजवळ तसेच रस्ते व रेल्वेमार्ग जवळ असलेल्या ठिकाणी जमीन मिळावी अशी कंपनीची इच्छा आहे. विस्तारासाठी जागा निश्चिती आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी मेरिटाईम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधींनी स्वतंत्र बैठक घ्यावी असेही फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT