ncb mumbai sakal
मुंबई

NCB Mumbai Scoud : एनसीबी मुंबई पथकातील अधिकाऱ्यांमधील वाद विकोपास; विभागीय कारवाई सुरू

एनसीबी मुंबई पथकातील अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - एनसीबी मुंबई पथकातील अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांमध्ये झालेला वाद इतका विकोपास गेला की त्यानंतर संबंधित एमआरए मार्ग पोलिसाना या संदर्भात तक्रार देण्यात आली आहे.

या घटनेनंतर वाद घालणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्याला सध्या निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकारी आता संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय कारवाई सुरू करण्यात पुढील असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अधिकारी सध्या चेन्नईमध्ये तैनात आहे. काही कार्यालयीन कामानिमित्त अधिकाऱ्याने सोमवारी एनसीबीच्या बॅलार्ड इस्टेट कार्यालयाला भेट दिली. त्यांनतर एनसीबी कार्यालयाच्या इमारतीबाहेर, अधिकाऱ्याचा एनसीबीच्या अन्य कर्मचार्‍यांशी वाद आणि बाचाबाची झाली. काही वेळातच ही बाब कार्यालयात उपस्थित एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली.

त्यानंतर एजन्सीने एमआरए मार्ग पोलिसांना घटनेची लेखी माहिती दिली. आता आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाई सुरू करण्यासाठी पुढील पावले उचलली जाणार आहेत. सध्या आरोपी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. असून याआधीही चेन्नईमध्ये अशाच प्रकारचा गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT