मुंबई

मोठी बातमी - अर्णब गोस्वामी यांना पुन्हा समन्स, वांद्रे मजुर गर्दी प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा आरोप... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : रिपब्लिक भारतचे अर्णब गोस्वामी यांना पुन्हा मुंबई पोलिसांनी समन्स बजावून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पायधुनी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वांद्रे येथे जमलेल्या मजुरांच्या गर्दीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

रझा अकादमीचे सचिव इरफान शेख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 एप्रिलला  गोस्वामी यांनी वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील झालेली गर्दी ऐवजी एका धार्मिक स्थळाजवळ ही गर्दी झाल्याचा दावा केला होता. तसेच विशेष समुदायाचे नागरीकच का गर्दी करतात, अशा दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे.

त्यानंतर त्यांनी याप्रकरणी दक्षिण मुंबईतील पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 153, 153 (अ), 295 (अ), 500, 505 (2), 511, 120 (ब) 505 (1) (ब) (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोस्वामी यांच्यासह रिपब्लिक भारत वृत्तवाहनीच्या मालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी गोस्वामी यांना समन्स पाठवण्यात आला आहे. पायधुनी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड हे या प्रकरणी तपास करणार आहेत. त्यामुळे गोस्वामी यांनी पायधुनी पोलिस ठाण्यात बुधवारी सकाळी 11 वाजता तपास अधिकारी गायकवाड यांच्यासमोर चौकशीसाठी हजर राहावे, असे समन्समध्ये  म्हटले आहे. अर्णब गोस्वामी यांना याआधीही एन.एम जोशी मार्ग पोलिसांनी समन्स बजावला होता. त्यावेळी तब्बल 12 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती.

Arnab Goswami summoned by Mumbai Police to appear before Pydhonie police station

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT