मुंबई

मुलुंडमध्ये ‘आर्ट ऑफ गिविंग ३.०’ कार्यक्रम

CD

मुलुंडमध्ये ‘आर्ट ऑफ गिविंग ३.०’ कार्यक्रम
जुन्या वापरण्यायोग्‍य वस्‍तू जमा करण्याचे आवाहन
मुलुंड, ता. ६ (बातमीदार) ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयईएस वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे एनएसएस युनीट व अर्बन सेज ग्रीन क्लब, स्वत्व, मी मुलुंडकर प्रतिष्ठान, स्त्री मुक्ती संघटना व परिसर भगिनी विकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्ट ऑफ गिविंग ३.०’ हा उपक्रम दिनांक बुधवार (ता.५) ते बुधवार (ता. १२) दरम्यान मुलुंडमध्ये राबविण्यात येत आहे
विशेष म्हणजे जुन्या वापरण्यायोग्य वस्तू नीट पॅक करून या संस्थेला देण्यात याव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. भगिनी विकास संघामार्फत कचरावेचक भगिनी आणि इतर गरजू कुटुंबांपर्यंत या उपयुक्त वस्तू पोहाेचवण्यात येणार असल्याची माहिती ‘मी मुलुंडकर’ संस्थेच्या अध्यक्षा मयुरा बाणावली यांनी दिली.
वस्तूंचा पुनर्वापर आणि गरजवंतांना मदत करण्यासाठी हा उपकम राबवण्यात येत आहे. पुनर्वापर हा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग आहे. या उपक्रमात सर्व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, आपल्या वसुंधरेचे रक्षण करावे, असे आवाहन मयूरा बाणावली यांनी केले आहे. सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ९ या कालावधीमध्ये ‘मी मुलुंडकर प्रतिष्ठान’ यांच्या मुलुंड पूर्वेतील कार्यालयामध्ये वस्‍तू जमा करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

Shaktipeeth Expressway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात 7 जुलैला एल्गार; मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे धरणे, 13 जिल्ह्यांतील बाधित शेतकरी सहभागी होणार!

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची लाय डिटेक्शन टेस्ट होण्याची शक्यता

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

IND vs ENG : 20 चेंडूत अर्धशतक; अभिषेक शर्माने मोडला केएल राहुलचा मोठा विक्रम, इंग्लंडमध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT