मुंबई - भारतीय बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन सरकारने मंजुरी दिली आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने चित्रीकरण पाहून मुंबईतील आर्थर रोड तुरुंग मल्ल्यासाठी सुरक्षित असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्याच्या प्रत्यार्पणासाठी ते महत्त्वपूर्ण ठरले.
मल्ल्या याला आर्थर रोड तुरुंगातील बराक क्र. 12 मध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तुरुंगाच्या चित्रीकरणानुसार ती बराक व तेथे जाण्याचा मार्ग समाधानकारक आहे. तेथील कोठडी मोठी असून, नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले आहे. काही प्रमाणात नैसर्गिक प्रकाश असलेल्या या कोठडीचे छत उंच आहे. कोठडीत दोन पंखे व दिवे आहेत, तसेच खिडकीला जाळी बसवण्यात आलेली आहे. मल्ल्या याला जाड सतरंजी, उशी, चादर व ब्लॅंकेट देण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे, असे वेस्टमिन्स्टर मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मल्ल्या याला आर्थर रोड तुरुंगात पुरेशी सुरक्षा पुरवण्यात येईल. अधिकारी व सुरक्षारक्षक 24 तास तैनात राहणार आहेत. तो बराक क्रमांक 12 मधील इतर कैद्यांच्या संपर्कात येणार नाही. महत्त्वाच्या गुन्ह्यांतील कैद्यांना ठेवले जात असल्याने या तुरुंगाची सुरक्षा भेदणे शक्य नाही, असे लंडनमध्ये त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे मल्ल्याचे प्रत्यार्पण सुकर झाले आहे.
कोठडीत आवश्यक सुविधा
वैद्यकीय निकषावर मल्ल्या खाटेसाठी अर्ज करू शकतो. त्याला पुरेसे पाणी देण्यात येईल; डॉक्टरांनी त्याला दिवसाला किमान तीन लिटर पाणी मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याच्या कोठडीलगतच स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. त्याची नुकतीच दुरुस्ती करण्यात आल्याचे दिसत आहे. त्यात शौचालय, शॉवर व बेसिन आहे. त्याला पुरेसे जेवण दिले जाईल. स्थानिक न्यायालयाने परवानगी दिल्यास त्याला घरचे जेवणही देण्यात येईल, असे निरीक्षण त्यांनी डिसेंबरमध्ये नोंदवले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.