मुंबई

एक तासानंतर आर्यन वकिल मानशिंदेंसोबत NCB कार्यालयातून पडला बाहेर

आर्यन वकिल निखिल मानशिंदे यांच्यासोबत सफेद रंगाच्या रेंज रोव्हरमधुन आला होता.

दीनानाथ परब

मुंबई: मागच्या आठवड्यात ड्रग्ज प्रकरणात (Drug case) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai high court) जामिन मिळाल्यानंतर आर्यन खान (Aryan khan) आज पहिल्यांदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Ncb) समोर हजर झाला. आर्यनला जामीन मंजूर करताना न्यायालयाने आठवड्यातून एकदा एनसीबी समोर हजर राहण्याची अट ठेवली आहे. दक्षिण मुंबईत NCB चं कार्यालय असून आर्यन आपले वकिल निखिल मानशिंदे यांच्यासोबत सफेद रंगाच्या रेंज रोव्हरमधुन आला होता.

दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात आर्यनला हजर रहावे लागणार आहे. आर्यन खान ३० ऑक्टोबर रोजी तुरुंगातून बाहेर आला होता. तब्बल २७ दिवसानंतर आर्यनची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती. आर्यन आणि सह आरोपी अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांना जामिन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने १४ अटी टाकल्या आहेत.

आर्यन खानला एनडीपीएस कोर्टात आपले पासपोर्ट जमा करावे लागेल तसेच विशेष कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय तो देशाबाहेर जाऊ शकणार नाही, अशा अटी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना ठेवल्या होत्या. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी ड्रग्ज प्रकरणात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT