मुंबई

SIT कडे दादलानीच्या मर्सिडीजचं फुटेज, ५० लाखाची डील लोअर परेलमध्ये?

शाहरुखचा मुलगा आर्यनला वाचवण्यासाठी ५० लाखाची डील लोअर परेल इथे झाल्याची शक्यता.

सुरज सावंत

मुंबई: ड्रग्ज केसमध्ये (Drug case) आर्यन खानची (Aryan khan) सुटका झाली असली, तरी रोज या प्रकरणात नवनवीन धक्कदायक बाबी समोर येत आहेत. शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीने (Pooja dadlani) आर्यनला वाचवण्यासाठी के.पी.गोसावीला (kp gosavi) ५० लाख रुपये दिल्याचा गौप्यस्फोट सॅम डिसूझाने केला होता. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत सॅम डिसूझाने हा दावा केला होता.

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईलने या प्रकरणात मध्यस्थ म्हणून सॅम डिसूझाचे नाव घेतले होते. आता याच आरोपाला बळकटी देणारे काही पुरावे समोर आलेत. शाहरुख खानची मॅनेजर पुजा दादलानीचं लोअर परळमधलं मर्सिडीज कारचं सीसीटीव्हीही फुटेज एसआयटी टीमच्या हाती लागलं आहे.

५० लाखाची डील याच लोअर परळ मध्ये झाल्याचं बोललं जातं आहे. हा व्हिडीओ एसआयटी टीमच्या हाती लागला आहे. किरण गोसावीच्या विरोधात एसआयटी टीम खंडणीचा गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. किरण गोसावी आणि पुजा दादलानी मध्ये डील झाल्याचा आरोप पंच प्रभाकर साईलने केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT