aryan khan cruise case sakal media
मुंबई

तारीख पे तारीख... आर्यन खानच्या जमीनावर आजही निर्णय नाहीच!

ओमकार वाबळे

आर्यन खानच्या जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यामध्ये आर्यन खानला कोणताही दिला मिळालेला नाही. या प्रकरणात उद्या पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. मुकुल रोहतगी आणि अमित देसाई यांच्यावतीने आर्यन आणि अरबाजची बाजू मांडण्यात आली. दोघांवर केलेली कारवाई अनधिकृत असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अखेर या प्रकरणाची सुनावणी उद्या पार पडणार असल्याची माहिती न्यायालयाने दिली.

कार्डेलिया क्रूज ड्रग्ज केस प्रकरणात आर्यन खान ३ ऑक्टोबरपासून अटकेत आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयात एनसीबीने आर्यन खानचा जामीन फेटाळायलाच हवा अशी मागणी केली. साक्षीदारांना फोडण्याचे आणि पुराव्यांशी छेडछाडीचा प्रयत्न केला जात असल्याचं एनसीबीने यावेळी न्यायालयात सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

काय म्हणाले आर्यनचे वकील ?

माझ्या क्लायंटकडून(आर्यन खान) कोणतीही गोष्ट हस्तगत करण्यात आलेला नाही. आणि त्याने कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन केले नव्हते. 3 ऑक्टोबरला त्याचे स्टेटमेंटही नोंदवण्यात आले आहे. आम्ही अनेक याचिकांमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे की हे अधिकारी पोलीस अधिकारी नसले तरी ते पोलिसांचे अधिकार वापरतात. त्यामुळे त्यांना अटक करण्याचा अधिकार असल्याचे ते सांगतात. मात्र, आर्यनकडून कोणताही अमली पदार्थ मिळालेला नाही. त्याने कशाचंही सेवन केलं नव्हतं. त्याची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली नाही. रोहतगी यांनी पंचनामा वाचून दाखवताना आर्यनचा मोबाईल जप्त केल्याची कोणतीही माहिती पंचनाम्यात नसल्याचं सांगितलं.

अरबाजकडे ड्रग्ज मिळाले. मात्र, आर्यनच्या ताब्यात कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते. सोबत असणाऱ्या अन्य व्यक्तीकडे ड्रग्ज होते. मात्र, याचा अर्थ त्याबद्दल मला माहिती आहे, किंवा मी ते सेवन करणार आहे, असं होत नाही. त्यामुळे अनधिकृतपणे ही अटक करण्यात आली आहे, असे अॅड. रोहतगी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : भीषण अपघात! भरधाव येणाऱ्या मॅजिक व्हॅनची ट्रकला धडक, नऊ जणांचा जागीच मृत्यू

सायली-प्रिया दोघीही आई होणार! ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

Ghodegaon Accident: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर भीषण अपघात; समोरासमोर धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, घोडेगाव परिसरात हळहळ..

Riyan Parag:'... तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहचणार नाही', दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला रियान पराग?

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT