Aryan khan 
मुंबई

शाहरुखचं टेन्शन वाढलं, आर्यनचा तुरुंगातील मुक्काम वाढला

ड्रग्ज साखळीत सक्रिय सहभागी होता हे सिद्ध करण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅट, फोटो इत्यादी स्वरूपात पुरेसे पुरावे आहेत, असं जामीन अर्जावर उत्तर देताना एनसीबीने म्हटले आहे

दीनानाथ परब

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावरील उद्या दुपारी १२ वाजता सुनावणी होईल. आर्यन हा बेकायदेशीर ड्रग्ज साखळीत सक्रिय सहभागी होता हे सिद्ध करण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅट, फोटो इत्यादी स्वरूपात पुरेसे पुरावे आहेत, असं जामीन अर्जावर उत्तर देताना एनसीबीने म्हटले आहे.

आर्यनने अरबाज मर्चंटकडून प्रतिबंधित अमली पदार्थ खरेदी केले असून त्याचे वितरणही केले आहे. तपासादरम्यान, एनसीबीला असेही काही पुरावे मिळाले आहेत, ज्यातून असं कळतंय की, आर्यन खान हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट नेटवर्कच्या संपर्कात होता. या संदर्भात एनसीबी पुढील तपास करत आहे. सहआरोपी अचित आणि हरिजनने आर्यन आणि अरबाजला चरस पुरवला हे स्पष्ट आहे, अशी माहिती एनसीबीने कोर्टात दिली.

आर्यन सह अरबाज खान, मुनमून धनेचा, नुपूर सतेजा आणि मोहक जैस्वाल यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. आर्यनच्या वतीने एड अमित देसाई यांनी बाजू मांडली. सध्या तपास महत्त्वाचा टप्प्यावर आहे आणि तपास यंत्रणेने महत्त्वाचे पुरावे जमा केले आहेत. त्यामुळे आता जर आर्यनला जामीन मंजूर केला तर त्यामुळे तपास प्रभावित होऊ शकतो, असा युक्तिवाद एनसीबीकडून करण्यात आला.

आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाही आणि त्याच्या विरोधात काही पुरावा देखील नाही. अटकेपासून आठवडाभर तो एनसीबीच्या ताब्यात आहे. दोन वेळा त्याचा जबाब नोंदविला आहे. मग आता त्याला कारागृहात का ठेवता ? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT