Aryan Shahrukh Khan sakal media
मुंबई

आर्यन खान आज NCB समोर होणार हजर

तब्बल २७ दिवसानंतर आर्यनची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती.

सुरज सावंत

मुंबई: सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan khan) याला क्रूझ ड्रग्ज पार्टी (Drugs party) प्रकरणी आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. आर्यन खान सध्या जामिनावर बाहेर आहे. आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्तींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

त्यानुसार त्याला दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजर रहावे लागणार आहे. आर्यन खान ३० ऑक्टोबर रोजी तुरुंगातून बाहेर आला होता. तब्बल २७ दिवसानंतर आर्यनची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती. दोन ऑक्टोबरला एनसीबीने समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली कॉर्डेलिया क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा मारला होता.

यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळले होते. या प्रकरणात आर्यनसह आठ जणांना अटक करण्यात आली होती. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा हे सुद्धा तुरुंगात होते. आता तिघे जामिनावर बाहेर आहेत. अभिनेत्री जुही चावला आर्यन खानसाठी जामीनदार राहिली आहे.

जुही चावलाने मागच्या शुक्रवारी सेशन कोर्टात जाऊन १ लाख रुपयाच्या जामीन हमीपत्रावर म्हणजे बेल बाँडवर स्वाक्षरी केली. जुहीने आर्यनच्या बेल बाँडवर स्वाक्षरी केली याचा अर्थ असा आहे की, आर्यन खान जर बेल बाँडची रक्कम भरु शकला नाही, तर त्याला सर्वस्वी कायदेशीररित्या जुही चावला जबाबदार असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT