as temperature rises electricity heats up daily demand 28 thousand mw mumbai Sakal
मुंबई

Mumbai Weather News : तापमानाचा पारा वाढतच राज्यात वीज तापली; दैनंदिन मागणी 28 हजार मेगावॅटवर

राज्यात ऐन हिवाळ्यातच तापमानाचा पारा वाढू लागल्याने वीज तापली आहे. एरवी हिवाळ्यात राज्याची विजेची मागणी २३-२४ हजार मेगावॅटच्या घरात असते, पण तापमान वाढू लागल्याने आठवडाभापासून मोठी वाढ झाली

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : राज्यात ऐन हिवाळ्यातच तापमानाचा पारा वाढू लागल्याने वीज तापली आहे. एरवी हिवाळ्यात राज्याची विजेची मागणी २३-२४ हजार मेगावॅटच्या घरात असते, पण तापमान वाढू लागल्याने आठवडाभापासून मोठी वाढ झाली असून आज तब्बल ती २७ हजार ९८० मेगावॅटवर पोहोचली आहे.

त्यामध्ये मुंबईच्या सुमारे २८०० मेगावॅटच्या विजेचा समावेश असून ती स्थिर आहे. त्यामुळे अचानक वाढलेली ही विजेची मागणी पूर्ण करताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

महावितरणचे राज्यभरात सुमारे पावणे तीन कोटी वीज ग्राहक असून त्यांची किमान मागणी १८ हजार मेगावॅट तर उन्हाळ्यात एप्रिल- मे महिन्यात कमाल मागणी जावळपास २६ हजार मेगावॅटपर्यंत जाते. तर मुंबईची मागणी चार हजार मेगावॅटचा टप्पा गाठते. मात्र यंदा फेब्रुवारी महिन्यातच मोठी वाढ नोंदल्याचे दिसत आहे.

आत चक्क महावितरणकडे राज्यभरातून २४ हजार ५४७ मेगावॅट एवढी नोंदील आहे. सदरची मागणी पूर्ण करण्यासाठी महातवितरणने महानिर्मितीकडून ७ हजार १०२ मेगावॅट वीज घेतली असून खासगी वीज प्रकल्पातून ९ हजार ७७३ मेगावॅट, केंद्रीय वीज प्रकल्पातून ९ हजार २६० मेगावॅट वीज घेतली आहे.

उन्हाळ्यात परिस्थिती बिघडणार

सध्या हिवाळा असतानाही राज्याची विजेची मागणी विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. मात्र उन्हाळ्यात महावितरणकडे २७ हजार मेगावॅटपर्यंत मागणी नोंदली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरात जेव्हा विजेची मागणी जास्त असताना महावितरणला आपली मागणी पूर्ण करताना कसरत करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT