मुंबई

जीव धोक्यात घालून कर्तव्य बजवणाऱ्या आशा सेविकांना अद्यापही कोव्हिड प्रोत्साहन भत्ता नाही

आहुती त्रिवेदी

बदलापूर : बदलापुरात E व मदतनीसांना गेल्या तीन महिन्यांपासून कोव्हिड-19 प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने नाराजी पसरली आहे. पालिकेने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, आशा सेविकांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने भत्ता देण्याबाबत आदेश देण्यात आल्याचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी स्पष्ट केले.  

बदलापूर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने पालिकेने मे महिन्याच्या सुरुवातीला वेगाने निर्णय घेण्यास सुरुवात केली. शहरातील रुग्ण वाढणाऱ्या प्रभागात, परिसरात बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्ती, इमारतीतील व्यक्तींची माहिती घेण्यासाठी पालिकेच्या वतीने 32 आशा सेविकांची व मदतनीस महिलांची नेमणूक करण्यात आली होती. या कामासाठी या सेविकांना दररोज 250 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आशा सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून प्रभागनिहाय सर्वेक्षण करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे काम या सेविकांकडून केले जाते. मात्र त्यानंतरही करोनाच्या संकटात आघाडीवर काम करणाऱ्या आशा सेविकांचा प्रोत्साहन भत्ता रखडल्याने या सेविकांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत आशा सेविकांनी मुख्याधिकारी दीपक पुजारी यांना एक पत्र दिले असून आमच्या कामाचा आढावा घेऊन लवकरात लवकर प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT