Ashadhi Ekadashi Wari 2024 MP Shrikant Shinde esakal
मुंबई

खांद्यावर भगवा ध्वज घेऊन टाळ वाजवत खासदार शिंदे विठू नामाच्या जयघोषात दंग; शिवसेनेच्या नेत्यांचाही वारीत सहभाग

विठुरायाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांसह सर्वच भक्तांना लागली आहे.

शर्मिला वाळुंज

राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठू- रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.

डोंबिवली : विठुरायाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांसह सर्वच भक्तांना लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी मंगळवारी तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तसेच ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी वारकरी (Warkari) संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला.

राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठू- रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यातील संत तुकोबा माउलींची, संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी मार्गात हजारो वारकरी एकत्र येऊन पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करत असतात. महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीच्या परंपरेत अनेक मान्यवर मंडळी देखील आवर्जून सहभाग होत असतात. गेल्या वर्षी प्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदा देखील या वारीत सहभाग घेतला.

Ashadhi Ekadashi Wari 2024 MP Shrikant Shinde

खासदार डॉ. शिंदे यांनी यांनी आज तरडगाव ते फलटण या मार्गावर श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तसेच ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी डॉ. शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला. यावेळी खासदार शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा वारकऱ्यांसाठी अनेक उपायोजना राबविल्या आहेत.

Ashadhi Ekadashi Wari 2024 MP Shrikant Shinde

विशेष दिंड्यांना आर्थिक साहाय्य, वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा, दिंड्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोफत औषधोपचार यांसारख्या उपायोजना राबविण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे यंदाची वारी ही आनंदाची वारी ठरली असल्याचे मत यावेळी वारकरी बांधवांनी व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT