अशोक चव्हाण  Sakal
मुंबई

रिपोर्ट आला अन् कॅबिनेट बैठकीमधून अशोक चव्हाण बाहेर पडले

चव्हाण बाहेर पडल्यामुळे त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कॅबिनेटची बैठक सुरू असताना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan) अचानक बाहेर पडले आहेत. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले असून, चव्हाण यांना पुन्हा कोरोनाची ( Covid Report) लागण झाली आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Maharashtra Cabinet Meeting )

याबाबत साम टिव्हिने दिलेल्या वृत्तानुसार, आज मंत्रीमंडळाची (Cabinet Meeting) बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. दरम्यान, बैठक सुरू असताना चव्हाण यांच्या मोबाईलवर एक रिपोर्ट (Covid Report On Mobile) आला आणि ते अचानक कॅबिनेटच्या बैठकीतून बाहेर पडले. त्यांच्या अशा अचानक बाहेर पडण्यामुळे चर्चांना उधाण आले असून, अशोक चव्हाण यांना पुन्हा कोरोनाची (Corona Report) लागण झाली आहे का? असे एक न अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, चव्हाण यांच्या मोबाईलवर आलेला रिपोर्ट नेमका कसला आणि कुणाचा होता हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही. मात्र, त्यांचे कॅबिनेटच्या बैठकीतून अशा अचानक बाहेर पडण्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून, त्यांना पुन्हा कोरोनोची (Corona) लागण तर झाली नाही ना? असा प्रश्न यामुळे अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT