Ancient temple in goa sakal
मुंबई

Ancient Temples : अष्टविनायकच्या धर्तीवर गोव्यात एकादशी तीर्थ; प्राचीन मंदिरे एकमेकांशी जोडली जाणार

गोवा राज्याला हिंदू धर्मासह बौद्ध, जैन आणि इतर धर्माचा मोठा प्राचीन वारसा आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गोवा राज्याला हिंदू धर्मासह बौद्ध, जैन आणि इतर धर्माचा मोठा प्राचीन वारसा आहे. त्यात हिंदू धर्माची धार्मिक स्थळे आणि मंदिरांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या धर्तीवर गोव्यातील मंदिरांना जोडण्यासाठी एकादशी तीर्थ नावाने एक मोठा तिर्थाटनाचा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठीची माहिती गोवा पर्यटन विभागाच्या उपसंचालक मनिषा कासकर यांनी मुंबईत दिली.

महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये असलेल्या अष्टविनायक या श्रीगणेशाच्या तिर्थस्थळांना जोडले गेले आहे. तिर्थाटन करण्यासोबत येथे मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटनही सुरू झाले असून त्याच धर्तीवर गोव्यातील श्री शांतादुर्गा कुकलकरीं फतोरपा, सप्तकोटेश्वर नरवे बिचोलीम, ब्रह्मकर्माळी सतारी, महागणपती खंडोळा, मंगेश मंदिर मंगेशी, महालसा मंदिर मर्दोल, महादेव मंदिर तांबडी सुर्ला, दामोदर देवस्थान झांबौली, परशुराम मंदिर पायगीं, हरी मंदिर मरगाव, श्री दत्त मंदिर सांखळी आदी धार्मिक स्थळांना एकमेकांशी जोडले जाणार असल्याचे उपसंचालकांनी सांगितले.

गोव्यात सागरी पर्यटन हा एक महत्वाचा भाग असला तरी सध्या मोठ्या प्रमाणात होमस्टे ही संकल्पना रुजवण्यात आल्याने त्याचा मोठा फायदा ग्रामीण भागातील नागरीकांना होत आहे. यामुळे ग्रामीण पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे.

विशेष म्हणजे या होमस्टे उपक्रमात ग्रामीण भागातील महिलांना सरकारकडून अनुदान दिले जात असून अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने गावातील महिला या आर्थिक विकासाकडे पोहोचत असल्याचेही उपसंचालक कासकर यांनी सांगितले. यावेळी सहायक पर्यटन अधिकारी चित्रा वेंगुर्लेकर, जीटीडीसीचे व्यवस्थापक विशेष नाईक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT