beating esakal
मुंबई

Dombivali Crime : लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितले; तरुणाचे डोकेच फोडले

कल्याण सूचक नाका परिसरात धक्कादायक प्रकार...

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - घरात सुरू असलेल्या लाऊड स्पीकरचा आवाज कमी कर म्हणून सांगण्यासाठी गेलेल्या तरुणाला शेजाऱ्यांनी दांडक्याच्या साह्याने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे. या हल्ल्यात जखमी तरुणाच्या डोक्याला 15 टाके पडले आहेत. तर मध्यस्थी करणाऱ्या जखमीच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली आहे.

या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जुनैद व त्याच्या अन्य दोन साथीदारांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली.

जखमी आझाद अल्ताफ रहेमानी (वय 25) या जखमी तरुणाच्या तक्रारीनुसार सुन्नी नूरी जामा मशिदीजवळ राहणारा जुनैद याच्या घरात स्पीकर वाजत होता. त्याचा आवाज खूप मोठा होता. स्पीकरच्या आवाजामुळे शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना त्रास होऊ लागला. त्यामुळे आझाद हा जुनैदच्या घरी गेला आणि त्याने आवाज कमी करण्यास सांगितले. हे ऐकून जुनैद संतापला. तू इथून जा, मी आवाज कमी करणार नाही, असे धमकावले.

मात्र आझाद याने तुझ्या स्पिकरच्या आवाजामुळे साऱ्यांना त्रास होत असल्याचे सांगितले. यावर जूनैद आणखीच भडकला. त्याने रस्त्यावर पडलेल्या दांदक्याच्या साह्याने आझादवर हल्ला चढविला. या हल्ल्यात आझादचे डोके फुटून तो गंभीर जखमी झाला. तर जुनैदच्या दोन पैकी एका साथीदाराने आझादला पकडून त्याच्या अंगठ्याला चावा घेतला.

आझादला मारहाण होत असल्याचे पाहून मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या त्याचा मित्र तबारख शेख यालाही दांडक्याने बुकलून काढले. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत आझाद याला जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या शास्त्रक्रियेत डोक्याला पंधरा टाके पडले.

या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमी आझादच्या जबानीवरून फरार हल्लेखोर जुनैद आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवून शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT