Aslam Shaikh 
मुंबई

Aslam Shaikh: हिंदू स्मशानभूमी तोडू देणार नाही, अस्लम शेख आक्रमक

जिल्हा नियोजन बैठकीत राडा झाला

Sandip Kapde

Aslam Shaikh: शेकडो वर्ष जूनी असलेलेली भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी काहीही झाले तरी  तोडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी घेतली. बुधवारी चेतना कॉलेज वांद्रे येथे पार पडलेली मुंबई उपनगर जिल्हा नियोजन बैठक वादळी ठरली आहे. या बैठकीत अस्लम शेख आक्रमक झाले होते.

मालाड-पश्चिम येथील भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी तोडण्याची याचिका जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याने अस्लम शेख आक्रमक झाले. ही  स्मशानभूमी अनधिकृत असून ती पाडण्यासंदर्भात याआधी चेतन व्यास नावाच्या व्यक्तिने कोर्टात याचिका दाखल केली होती.

त्यानंतर न्यायालयाने या याचिकेची दखल घेत मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र सागरी क्षेत्र प्राधिकरण (MCZMA) यांना स्मशानभूमी संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र भाटी मच्छीमार ग्रामविकास मंडळाची बाजू न ऐकून घेता, नोटीस न देता, कोणतीही सुनावणी न घेता ही स्मशानभूमी तोडण्याची कारवाई करण्यात आली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई विरोधात भाटी मच्छीमार ग्रामविकास मंडळाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात ही स्मशानभूमी १९९० पूर्वीची असल्याचे पुरावे (बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पावत्या) मंडळाने सादर केल्या. तसेच ही स्मशानभूमी सीआर झेड २ मध्ये येत असल्याच्या याचिकाकर्त्यांच्या दाव्यावर सदर स्मशानभूमी एमसीझेडएमए अस्तित्वात येण्याआधी पासूनची आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले. (latest marathi news)

या संदर्भात याचिकाकर्ते चेतन व्यास यांना मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयाचा दंड ठोठावत त्यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. उच्च न्यायालयाने ही स्मशानभूमी पुन्हा बांधून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास त्यानंतर दिले होते.

स्मशानभूमी पुन्हा बांधून दिल्यानंतरही पुन्हा या स्मशानभूमी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने भाटी गावच्या ग्रामस्थांमध्ये प्रशासनाबद्दल प्रचंड असंतोषाची भावना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus Accident: बेस्टचा भीषण अपघात! रिव्हर्स घेताच पादचाऱ्याला चिरडलं, नंतर बाईक आणि रिक्षावर आदळली; थरारक घटनेचा Video Viral

'बाई वाड्यावर या असं बाबांनी म्हटलंच नाहीय' वडील निळू फुलेंबद्दल बोलताना गार्गी फुले म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळली, १४ नागरिक अडकले

Pune: बंधाऱ्याचे ढापे वेळेत न काढल्याने शेताचे नुकसान; मुसळधार पावसामुळे शेत वाहून गेले; नुकसानभरपाईची ग्रामस्थांची मागणी

Parbhani: खड्ड्यांनी पिळले, चिखलानेही छळले!; शहराअंतर्गत प्रमुख रस्त्यांचीच दुरवस्था; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT