मुंबई

"सत्तेत असलो तरीही 'सामना' वाचत नाही"

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्रात सध्या राजकीय धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. त्या मुद्द्यावरून 'सामना'च्या 'रोखठोक' या सदरातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. 'गेल्या काही महिन्यांत जे घडले त्यामुळे महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?", अशा शब्दात राऊत यांनी सरकारवर टीका केली. या टीकेनंतर ठाकरे सरकारमधील नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राऊताना टोला लगावला.

"सामनामध्ये काय लिहिलं आहे ते मी वाचलेलं नाही. सामनामध्ये काय लिहून येतं याला महत्त्व देण्याची फारशी गरज आहे असं मला वाटत नाही. मी सत्तेत असलो तरीही सामना वाचत नाही. ही तीन पक्षाची आघाडी आहे. सध्या तीन पक्ष आपल्या हिशोबाने चालत आहे. सामनामध्ये जे लिहिलं जातं त्याबद्दल शिवसेनेच्याच नेत्यांनी बोलावं असं मला वाटतं. त्यांनी लिहिलेल्या गोष्टींमध्ये गांभीर्य आहे की नाही हे तेच सांगू शकतील", असा टोला मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी लगावला.

"आधी चर्चा रंगली होती की अजित पवार दिल्लीत गेले आहेत. आता अशा चर्चा रंगल्या आहेत. पण मी सांगतो की या साऱ्या केवळ बातम्या पेरल्या जात आहेत. कोणीही कोणत्याही पक्षात असलं तरी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना भेटू शकत नाहीत का? शरद पवार हे राज्यसभेत असतात. अमित शाह हे गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची भेट कामानिमित्त किंवा मैत्रीपूर्ण असू शकते. मी आणि आमचे सहकारीदेखील राज्यातील भाजप नेत्यांना भेटत असतो. आम्ही सारे जण एकमेकांच्या सहकार्याने जनतेची कामे करत असतो. त्यामुळे मला वाटतं की यावर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही", असं शेख यांनी स्पष्टीकरण दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT