आदर्शवत कर्तव्यनिष्ठा; शेवटच्या दिवशीही ते मैदानात जिकरीने लढले... 
मुंबई

आदर्शवत कर्तव्यनिष्ठा; शेवटच्या दिवशीही ते मैदानात जिकरीने लढले...

सकाळ वृत्तसेवा

मिरा रोड : कोरोनाच्या संकटात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अहोरात्र कार्यरत आहेत. कोरोनाच्या संसर्गाने अनेक पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तरीही न डगमगता एका कोरोना योध्दाने सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशीही मैदानात उतरत आदर्श निर्माण केला आहे.

 
मिरा-भाईंदर शहर वाहतूक विभागात मनुष्यबळ कमी असल्याने अनेकांना लॉकडाऊनमध्ये सुट्टी मिळेनाशी झाली आहे. कोरोनाच्या या थैमानात ज्येष्ठ नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात असतानाच शासकीय कार्यालयांतील 55 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कामावर न येण्याचे आदेश देण्यात आले आहेत; मात्र शहरातील पोलिसांचे मनुष्यबळ पाहता वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताचे काम न देता त्यांना कार्यालयीन अथवा पोलिस ठाण्यातील लेखनीक काम दिले जात आहे; पण अत्यावश्यक समयी त्यांना नाईलाजास्तव रस्त्यावर येऊन कर्तव्य बजवावे लागत आहे. त्यात ठाणे ग्रामीणच्या काशिमिरा वाहतूक शाखेचे सहायक उपनिरीक्षक भगवान पवार यांचा समावेश आहे. 

मुंबई पोलिस दलात 1 डिसेंबर 1986 रोजी शिपाई पदावर भरती झालेले पवार यांना कालांतराने राज्य राखीव पोलिस दलात काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान, त्यांनी गडचिरोली या नक्षलवादी भागात काम केले. काही वर्षानंतर त्यांची ठाणे ग्रामीण पोलिस दलात बदली करण्यात आली. जुलै 2016 मध्ये त्यांची ठाणे ग्रामीणच्या काशिमिरा वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ठाणे ग्रामीण पोलिस दलातील वाहतूक विभागात काम करताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सुमारे 40 हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई केली. दंडात्मक कारवाईतून सुमारे 1 कोटीहून अधिक महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला. त्यांनी आपल्या निवृत्तीच्या शेवटच्या 31 मे दिवशीसुद्धा भाईंदर पूर्व गोल्डन नेस्ट सर्कल येथील नाकाबंदीच्या ठिकाणी लॉकडाऊनच्या काळातही कर्तव्य बजावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: अमेरिकेतलं १२९ टन सोनं माघारी आणलंच नाही..! एका निर्णयाने फ्रान्सची सेंट्रल बँक तोट्यातून थेट नफ्यात

IPL 2026 New Rule: आयपीएलने खेळाडूंसाठी आणला नवा नियम! ज्याचं नाव, त्यालाच परवानगी... नव्या नियमाने फ्रँचायझींमध्ये गोंधळ

Latest Marathi News Live Update: मीरा-भाईंदर परिसरातील कचरा आणि मातीचं मिश्रण मुंबईत टाकल्याचा प्रकार

Kirit Somaiya journalists clash : किरीट सोमय्यांची पत्रकारांना थेट दमदाटी, प्रश्न विचारताच भडकले; मुंबईतील घटनेने खळबळ

Pune Politics: खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते–भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पुण्यात तासभर चर्चा; भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT