mumbai trans harbour link pm modi maharashtra visit india longest bridge mumbai atal setu sakal
मुंबई

Mumbai News: अटल सेतू होणार १४ तासांसाठी बंद; जाणून घ्या काय आहे कारण?

१७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ पासून १८ फेबुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे

सकाळ वृत्तसेवा

Atal Setu: अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावाशेवा अटल सेतू (एमटीएचएल) या मार्गावर एमएमआरडीएकडून शिवडी गाडी अड्डा मुंबई ते चिर्ले, नवी मुंबई या मार्गावर १८ फेब्रुवारी रोजी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.

त्यामुळे १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ पासून १८ फेबुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली.

-

स्पर्धेकरीता येणाऱ्या धावपटूंनी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा (विशेषतः रेल्वे / लोकल ट्रेन) करीता शिवडी रेल्वे स्थानकाचा वापर करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- सर्व वाहनास नो एन्ट्री - फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ११.०० वाजल्या पासुन ते १८ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १.०० वा पर्यंत अटल बिहारी वाजपेयी शिवडी व्हावा शेवा अटल सेतू शिवडी गाडी अडडा मुंबई ते चिलें नवीमुंबई (दक्षिण व उत्तर वाहीनी) हा मार्ग सर्व वाहनास वाहतूकीस बंद राहणार आहे.

- पर्यायी मार्ग:- मेसेंट रोड (मुंबई पोर्ट ट्रस्ट) चेंबुर-वाशी खाडी (ठाणे क्रिक ब्रिज) पुल मार्ग नवी मुंबई कडे.

-अवजड वाहनांना फ्लेमिंगो गार्डन (भक्ती पार्क ई) येथुन (दक्षिण वाहिनी) ) येथून १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ०३. ०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत मेसेंट रोड (मुंबई पोर्ट ट्रस्ट रोड) करीता प्रवेश बंद राहिल.

- मानखुर्द जकातनाका येथुन १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ०३.०० ते दुपारी १३.०० वाजेपर्यंत अवजड वाहनांना परिस्थितीनुसार मुंबई शहरामध्ये प्रवेश देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT