atal setu 14 cr income 8 lakh vehicle transport Sakal
मुंबई

Atal Setu : अटल सागरी सेतूवरील टोलने एमएमआरडीए मालामाल; महिनाभरात ८ लाख वाहनांचा प्रवास, १४ कोटी रुपयांची कमाई

शिवडी- न्हावा शेवा अटल सागरी सेतूवरील टोलने एमएमआरडीए मालामाल झाले आहे. सागरी सेतू वाहतूकीसाठी खुला झाल्यापासून गेल्या महन्याभरात तब्बल ८ लाख १३ हजार ७७४ वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : शिवडी- न्हावा शेवा अटल सागरी सेतूवरील टोलने एमएमआरडीए मालामाल झाले आहे. सागरी सेतू वाहतूकीसाठी खुला झाल्यापासून गेल्या महन्याभरात तब्बल ८ लाख १३ हजार ७७४ वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. त्यांच्याकडून जवळपास १३ कोटी ९५ लाख ८५ हजार रूपयांचा टोल वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान सागरी सेतूवरून सर्वाधिक ७ लाख ९७ हजार कार धावल्या आहेत. मुंबईकरांची सायन- पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून एमएमआरडीएने तब्बल १७ हजार कोटी रूपये खर्चून २१ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू उभारला आहे. नवी मुंबई, पनवेल, पुणे, अलिबागहून मुंबईच्या दिशेने येणा-या वाहनधारकांकडून या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

सरासरी दररोज ७५ हजार वाहने या मार्गावरून प्रवास करतील असा अंदाज आहे. मात्र गेल्या महिनाभरातील अकडेवारी पाहता दररोज सरासरी ६० हजार वाहने ये-जा करत आहेत. पहिल्याच महिन्यात मोठा प्रतिसाद मिळू लागल्याने टोलच्या माध्यमातून एमएमआरडीएला मोठा महसूल मिळाल्याचे दिसत आहे.

सेल्फी बहाद्दरांकडून १२ लाखाचा दंड वसूल

अटल सेतूवरील टोलच्या माध्यमातून एमएमआरडीएला मोठी महसूल मिळालेला असतानाच १६१२ सेल्फी बहाद्दरांकडून वाहतूक पोलिसांनाही दंडाच्या माध्यमातून जवळपास १२ लाख ११ हजार रूपयांचा दंड मिळाला आहे.

सागरी सेतूवर वाहने ताशी १२० किलोमीटर वेगाने चालवण्यास परवानगी आहे. त्यामुळे सेतूवर थांबून सेल्फी घेण्यास बंदी आहे. तरीही अनेक हैसी वाहनधारक सेल्फी घेतात. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी १३८७ तर मुंबई पोलिसांनी २२५ जणांना दंडाचा दणका दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT