Atal Setu_Mumbai 
मुंबई

Atal Setu Innauguration: PM मोदींनी भाषण घेतलं आटोपतं अन् तडकाफडकी निघून गेले! कारण आलं समोर

याची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अटल सेतू - मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु असतानाच त्यांनी ते आवरत घेतलं आणि तडकाफडकी निघून गेले. पण मोदींनी असं काय केलं याची चर्चा मात्र सुरु झाली. या चर्चेचं कारणही आता समोर आलं आहे. (atal setu inauguration pm modi interrupted his speech and left in a hurry the reason came out)

नेमकं काय घडलं?

अटल सेतूचं उद्घाटनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी या समुद्रातील सेतूवरुन प्रवासही केला. प्रवासानंतर दुसऱ्या टोकाला मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषण झाली. (Latest Marathi News)

त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील काही रेल्वे मार्गांचं उद्घाटनं आणि लेक लाडकी योजनेंतर्गत काही लाभार्थ्यांना चेकचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर मोदी भाषणासाठी उभे राहिले. त्यांचं भाषणंही सुरु झालं, यामध्ये त्यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना विरोधकांवर टीकाही केली. यावेळी मोदींनी वेगानं आपलं भाषण उरकत असल्याचं दिसलं. अखेर भाषण आवरत घेत त्यांनी तातडीनं बाहेर जाण्यासाठी निघाले. माध्यमांकडून याचं थेट प्रक्षेपण सुरु होतं. पण मोदींचं भाषण केव्हा संपलं आणि ते केव्हा बाहेर पडले हे कळूनच आलं नाही.

मोदींच्या निघून जाण्यानं चर्चांना उधाण

मोदींच्या या घाई-गडबडीमुळं नेमकं काय घडलं याची राजकीय वर्तुळात तसेच जनतेतही चर्चा सुरु झाली. याबाबत सकाळनं स्थानिक पोलिसांकडून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी मोदी घाईत का निघून गेले याचा खुलासा केला. (Marathi Tajya Batmya)

पोलिसांनी सांगितलं कारण

पोलिसांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर सूर्यास्ताआधी टेक ऑफ घेणं अपेक्षित होतं. त्यामुळे संध्याकाळी ६.०२ पर्यंत मोदींनी आपला कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरमध्ये बसणं अपेक्षित होतं. पण, मोदींचं भाषणच ६ वाजून ४ मिनिटांपर्यंत चाललं. कारण सूर्यास्ताआधी हेलिकॉप्टरनं टेक ऑफ घेताच मोदी मुंबईकडे रवाना होणार होते. त्यानंतर मुंबईहून मोदींचा विमानानं दिल्लीकडे प्रवास होणार होता. (Latest Marathi News)

त्यामुळे मुंबईतल्या कार्यक्रमातलं भाषण आटोपताच मोदी हे मंचावरुन तडकाफडकी निघून जाताना दिसले. शेड्युलनुसार त्यांना नवी मुंबईतून ५.४५ वाजताच निघणं अपेक्षित होतं. पण कार्यक्रम लांबला तर जास्तीत जास्त ६ पर्यंतची वेळ देण्यात आली होती. जेणेकरुन सूर्यास्ताआधी हेलिकॉप्टर नवी मुंबईतून टेक ऑफ घेईल अन् वेळेत मुंबईत पोहचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT