Fraud sakal
मुंबई

Crime News: एटीएम मधून पैसे काढता न येणाऱ्या नागरिकांच्या मदतीला ते पुढे जायचे अन...

Chinmay Jagtap, सकाळ वृत्तसेवा

Dombivali Crime News : एटीएम कार्डचा पिन कोड जाणून घेत कार्डची अदलाबदल करत नागरिकांना दोघा भामट्यांनी लुबाडले असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक ज्हा याला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे. दीपक यांच्याकडून तब्बल 92 एटीएम कार्ड पोलिसांनी हस्तगत केले असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.

कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात दोन महिलांनी एका भामटाने त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करत पैसे काढल्याची तक्रार नोंदवली होती. त्या दोघी कल्याण मधील एका एटीएम सेंटरमध्ये गेल्या. त्यांनी सेंटरमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला.

त्यांचे पैसे एटीएममधून निघाले नाही. त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी एक तरुण पुढे आला. त्यानेही प्रयत्न केला पैसे निघाले नाही. थोड्याच वेळात त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आल्याचा संदेश त्यांना आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलैश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी तानाजी वाघ यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता त्यात दोन तरुण कैद झाले. पोलिसांनी त्यांची ओळख पटवत गुप्त बातमीदार यांच्या मार्फत माहिती काढली. व सापळा रचत दीपक याला अटक केली. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरु आहे. दीपक झा याच्याकडून विविध कंपन्याचे 92 एटीएम कार्ड पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

दीपक एटीएम बाहेर उभा राहायचा. स्टेशन परिसरात अनेक नागरिक एटीएम सेंटरमध्ये येतात. ज्यांना एटीएम ऑपरेट करता येत नाही. त्याची माहिती नसते. अशा नागरिकांना दीपक व त्याचा साथीदार हेरायचा. असे नागरीक जेव्हा एटीएममध्ये पैसे काढण्यास जात त्यांना मदतीच्या नावाखाली दीपक झा आणि त्याचा साथीदार आत यायचे.

पीन कोड काय टाकला जात आहे ते पाहून घ्यायचे. बोलण्यात गुंतवून हातचलाखी करुन एटीएम बदलून टाकायचे. दुसरा एटीएम कार्ड त्या नागरीकांच्या हाती द्यायचे. डुप्लीकेट एटीएमच्या सहाय्याने पैसे काढण्याचे नाटक करायचे. पैसे निघत नसल्याने नागरीक घरी जायचे. त्यानंतर दीपक झा आणि त्याचा साथीदार ओरीजनल एटीएमच्या सहाय्याने पैसे काढून घ्यायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मान्सूनसाठी अजून प्रतीक्षा! नियमित पावसाची दमदार एन्ट्री कधी? हवामान खात्याचा मोठा अंदाज

"तू नक्की २०० धावा करशील, फक्त..." आयपीएलचा बादशहा बनलेल्या वैभव सूर्यवंशीला ललित मोदींचा सल्ला, तू मोठा सेलिब्रिटी..

Graduate Youth News : D.Ed झालं, MPSC दिली, पण...; कायमस्वरूपी नोकरी आणि लग्न न ठरल्याने 38 वर्षीय पदवीधर युवकानं उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : सांगलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला अटक

Video : कमळी पडणार हृषि सरांच्या प्रेमात ! प्रोमो पाहून प्रेक्षक खुश "आमची अखेर प्रतीक्षा संपली.."

SCROLL FOR NEXT