Crime sakal
मुंबई

Crime News : एटीएम व्हॅनमधील रोकड लुटून चालकाचे पलायन

कांदिवली पूर्व परिसरात एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली रोख रक्कम घेऊन चालकाने पलायन केल्याची घटना उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कांदिवली पूर्व परिसरात एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली रोख रक्कम घेऊन चालकाने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी चालकाने 22 लाख 43 हजार रुपयांची रोकड पळवली असून याप्रकरणी समता नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपी चालक सागर सोनवणे याचा तपास समता नगर पोलीस करत आहेत.

या प्रकरणी तक्रारदार राजाराम घाडीगावकर एका खासगी कंपनीत कार्यारत आहेत. त्यांची कंपनी विविध बँकांकडून रोख रक्कम घेऊन ती विविध बँकांच्या एटीएम यंत्रांमध्ये पोहोचवण्याचे काम करते. राजाराम घाडीगावकर नेहमीप्रमाणे 15 जुलै रोजी साडेतीन कोटी रुपयांची रोकड घेऊन बँकेतून निघाले होते.

यावेळी त्यांच्यासोबत चालकासह दोन सहकारी होते. इतर एटीएम यंत्रांमध्ये रक्कम भरल्यानंतर कांदिवली येथील ठाकूर संकुलातील एटीएम यंत्रामधून त्यांनी 22 लाख 43 हजार रुपये घेतले. त्यानंतर ते गाडी घेऊन आकुर्ली रोड येथे पैसे भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी चालकही व्हॅनमध्येच होता. राजाराम घाडीगावकर परत आले असता चालक तेथे नव्हता. तसेच व्हॅनमधील रोखही नव्हती. त्यांनी चालकाचा शोध घेतला. त्यावेळी तो कुठेच सापडला नाही.

घाडीगावकर यांनी चालकाला दूरध्वनी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा मोबाईल बंद होता. अखेर याप्रकरणी त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी चालक सागर सोनावणेविरोधात गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT