priti menon sakal
मुंबई

Mumbai News : आपच्या नेत्या प्रीती मेनन - शर्मा यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

अटक न केल्यास राज्यभर निलंबित मराठी नेत्यांचा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आम आदमी पक्षाला मुंबईत वाढविण्यासाठी राबणा-या मराठी कार्यकर्त्यांना कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही. त्यांना उलट त्यांना अपमानित करून जातीवाचक शिविगाळ करून पक्षातून निलंबित करणाऱ्या आपच्या मुंबई अध्यक्ष प्रीती मेनन - शर्मा आणि मनू पिल्लाई यांच्यासह 20- 25 कार्यकत्यांविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात (अट्रॉसिटी) कायद्या- नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांना तत्काळ अटक न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे मुंबईचे उपाध्यक्ष रमेश भुतेकर देशमुख यांनी दिला आहे. आम्हाला कुठलीही पूर्वत नोटीस नोटीस न देता आप मुंबई चकाला कार्यालयात बोलावण्यात आले.

आम्ही तिथे गेलो असता तिथे 25-30 जणांचा जमाव होता. प्रीती मेनन - शर्मा यांनी काही जणांनी ऑफिसचे दरवाजे बंद केले, शिविगाळ आणि धक्काबुक्की केली, असा आरोप उपाध्यक्ष भुतेकर-देशमुख, आपचे मुंबई प्रवक्ते ॲड.राकेश राठोड आणि डॉ. संजय कांबळे- बापेरकर यांनी यांनी केला. संजय कांबळे - बापरेकर यांनी प्रीती शर्मा मेनन यांना घडलेला प्रकार सांगितले असता, मेनन यांनी बापरेकर यांना जातीवाचक शिवीगाळ केली.

या प्रकरणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रोसिटी) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी या मराठी नेत्यांनी केली आहे.

पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून मराठी नेत्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले नाही. त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहेत. त्यामुले आमच्या भावना दुखावल्या गेल्या अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पक्षाचे ध्येय धोरणे चांगली आहेत. मात्र मुंबई महाराष्ट्रात अमराठी नेते पक्षाचे नुकसान करीत आहेत. पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT