Electricity Theft Sakal
मुंबई

Electricity Theft : महावितरणच्या पथकावर हल्ला प्रकरण; दुधकर कुटूंबाने केली 17 लाख 68 हजारांची वीजचोरी

मलंगगड भागातील काकडवाल गावात वीजचोरी शोध मोहिम पथकाला मारहाण झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.

शर्मिला वाळुंज

मलंगगड भागातील काकडवाल गावात वीजचोरी शोध मोहिम पथकाला मारहाण झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.

डोंबिवली - मलंगगड भागातील काकडवाल गावात वीजचोरी शोध मोहिम पथकाला मारहाण झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. पथकास मारहाण करणारे काकडवाल गावातील दुधकर कुटूंबाने तब्बल 17 लाख 68 हजार 780 रुपयांची वीज चोरी केली असल्याची बाब महावितरणच्या पहाणीत उघडकीस आली आहे. वीज चोरी प्रकरणी दुधकर कुटूंबाविरोधात अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेतील मलंगगड पट्ट्यात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होते. या भागातील वीज चोरी उघडकीस आणण्यासाठी तसेच वीज बील वसुलीसाठी महावितरणच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. काकडवाल गावातील दुधकर कुटूंबाच्या घरी महावितरणचे भरारी पथक हे 11 जानेवारीला पाहणीसाठी गेले होते.

या पथकामध्ये महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसह इतर अभियंते व कर्मचारी असे दहा ते बारा जणांचे पथक होते. या पथकास दुधकर कुटूंबाकडून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी दुधकर कुटूंबातील अनंता, अशोक आणि प्रकाश यांसह पाच जणांविरोधात हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महावितरण अधिकाऱ्यांनी अधिक तपास केला असता या तिघांनीही मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅपिंग करत मीटर टाळून वीजचोरी केल्याचे आढळून आले. अनंता दूधकर याने 6 लाख 69 हजार 550 रुपयांची सुमारे 28 हजार 252 युनिटची चोरी केली.

प्रकाश दूधकर याने 7 लाख 23 हजार 390 रुपयांची 30 हजार 869 युनिट तर अशोक दूधकर याने 3 लाख 57 हजार 840 रुपये किमंतीची 13 हजार 211 युनिट वीज चोरून वापरल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक अभियंता रविंद्र नाहिदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक श्रीरंग गोसावी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT