उल्हासनगरात महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टरवर टोळक्याचा जीवघेणा हल्ला Sakal
मुंबई

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरात महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टरवर टोळक्याचा जीवघेणा हल्ला, गाडीची तोडफोड

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री यांचे निकटवर्तीय असलेले महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर विशाल माखीजा यांच्यावर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना काल सायंकाळी उल्हासनगरात घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री यांचे निकटवर्तीय असलेले महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर विशाल माखीजा यांच्यावर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना काल सायंकाळी उल्हासनगरात घडली आहे.

या हल्ल्यात माखीजा जखमी झाले असून त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. विशाल माखीजा हे कॅम्प 4 मधील दहा चाळ रोड सेंट्रल पार्क हॉटेल जवळील रस्त्याची पाहणी करत होते.त्याच दरम्यान हॉटेल मध्ये बसलेल्या 10 ते 12 जणांच्या टोळक्याने विशाल माखीजा यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर अंदाधुंद दगडफेक केली.

त्याला माखीजा यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.मात्र टोळक्याने दगडफेक सुरू केल्याने व माखीजा यांच्या डोक्यात काचेची बाटली फोडण्यात आली.या टोळक्याने कन्स्ट्रक्शन साईड वरील फावडा आणि टिकाव यांच्या साह्याने कामगाराना मारहाण करुन मिक्सरची आणि माखीजा यांच्या गाडीची तोडफोड केली.

जखमी विशाल माखीजा यांच्यावर प्रथम शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी विठ्ठलवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक केली आहे.बाकींचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT