extortion crime esakal
मुंबई

Mumbai Crime : चालत्या रिक्षात प्रियकराकडून प्रेयसीचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न

भांडुपमध्ये चालत्या रिक्षात प्रियकराकडून प्रेयसीची गला चिरून हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भांडुपमध्ये चालत्या रिक्षात प्रियकराकडून प्रेयसीची गळा चिरून हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी प्रियकर चेतन गायकवाडला अटक केली असून पिडीत तरुणीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रेमसंबंधाला नकार दिल्याच्या रागात आरोपी प्रियकराने प्रेयसीला खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अंधेरीच्या हॉटेल मध्ये नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून पुन्हा घराकडे परतत असताना चालत्या रिक्षातच चाकूने तिच्या मानेवर आरोपीने वार केले.

प्रेमसंबंध हत्येचे कारण?

मुंबईच्या भांडुप परिसरात 21 वर्षीय तरुणी वास्तव्यास असून, आरोपी चेतन टेंभीपाडा येथील रहिवासी आहे. पिडीत तरुणीचे आरोपी चेतनशी प्रेमसंबंध होते. कालांतराने दोघामध्ये वादावादीने नात्यात अडचणी निर्माण झाल्या. पुन्हा एकत्र येत लग्नासाठी चेतन तरुणीच्या पाठी लागला.

12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11च्या सुमारास चेतनने तिला भांडुपमधील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्यास प्रेयसीने नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादात चेतनने त्याच्या प्रेयसीला मारहाण केली.

बदनामीची धमकी

त्यानंतर परत 14 ऑक्टोबर शनिवारी सायंकाळी 4 वाजता भांडुपच्या एलबीएस रोड येथे भेटायला बोलावले. भेटण्यास आली नाही तर जवळील खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी चेतनने तरुणाला दिली. तरुणी बदनामीच्या भीतीने सोबत येण्यास तयार झाली. रिक्षातून अंधेरीतील एका हॉटेल मध्ये नेले. तेथे जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तेथून रिक्षाने भांडुपकडे निघाले.

तरुणीने नात कायम ठेवण्यास नकार दिल्याने रिक्षा भांडुप परिसरात येताच चेतनने सायंकाळच्या सुमारास जवळील चाकूने तरुणीच्या मानेवर वार करत घटनास्थळावरून पळ काढला. तरुणीने रिक्षा पार्क साईट पोलीस ठाण्यात वळवली. जखमी तरुणीला रिक्षा चालकांच्या मदतीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहे. तरुणीच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी रविवारी आरोपी चेतनला बेड्या ठोकल्या आहेत.

तरुणीची प्रकृती स्थिर असून अधिक तपास सुरू असल्याचे भांडुप पोलिसांकडून माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT