Anil Parab  sakal media
मुंबई

कामावर हजर व्हा निलंबन मागे घेऊ; अनिल परब

‘‘एसटी विलीनीकरणाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान करण्याची राज्य सरकारची भूमिका किंवा तशी इच्छाही नाही. संप मागे घेतला जात नसल्याने आतापर्यंत केवळ प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून कारवाई केली आहे. सोमवारपर्यंत निलंबन झालेले व न झालेले अशा सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही संभ्रमात भावनिक आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

‘‘एसटी विलीनीकरणाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विलीनीकरणाबाबत १२ आठवड्यानंतर समिती मुख्यमंत्र्यांना आपला अहवाल सादर करेन. त्यानंतर मुख्यमंत्री हा अहवाल उच्च न्यायालयात सादर करतील. त्यामुळे संपकऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी नक्कीच न्यायालयात लढा द्यावा; मात्र सध्या एसटीची सेवा सुरू करणेही गरजेचे आहे. सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. राज्यभरातून अनेक एसटी कर्मचारी कामावर हजर होण्यास तयार असताना त्यांना काही अडचणी येत असल्यास अशा कर्मचाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील एसटी प्रशासन किंवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी.’’ असेही परब म्हणाले.

संपामुळे एसटी महामंडळाचे आतापर्यंत ५५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होऊनही संपकरी ऐकण्यास तयार नसल्यास सोमवारनंतर नाईलाजास्तव कायदेशीर कारवाईला सुरुवात करावी लागेल, असेही परब यांनी नमूद केले.

तीन दिवसांची मुभा

संपकाळात गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि सेवासमाप्तीची कारवाई महामंडळाने केली आहे. कामगारांना आणखी एक संधी म्हणून तीन दिवसांची मुभा देण्यात आली आहे. ५० टक्के संख्येने सुरू होणाऱ्या आगारात संबंधित कर्मचाऱ्यांना कामावर घेतले जाणार आहे. जिथे ही संख्या कमी असेल, तिथे बाजूच्या ‘डेपो’मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात येईल.

एसटी कर्मचारी कामावर हजर झाल्यास त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाणार नाही, असा हेतुपुरस्पर संभ्रम पसरविला जात आहे. अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे.

- अनिल परब, परिवहन मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT