नेहमीच मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या कलाकारांनी आज मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती.
मुंबई - नेहमीच मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या कलाकारांनी आज मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. काही कलाकारांनी याकरिता सुपारी घेतली होती तर काही कलाकारांनी आपापले चित्रपट आणि मालिकांचे या उत्सवात जोरदार प्रमोशन केले. मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे समजते.
दादर येथील आयडीयल बुकच्या दहीहंडी उत्सवात कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवामधील गायकांनी हजेरी लावली तसेच बाॅईज ३ मधील कलाकार आणि 'रुप नगरके चिते' या चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली. या कलाकारांबरोबर फोटो काढण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. रुप नगर के चीते या चित्रपटाचे दिग्दर्शक विहान सूर्यवंशी, निर्माते मनन शाह आणि कलाकार करण परब, कुणाल शुक्ल, हेमल इंगळे, आयुषी भावे, सना प्रभू आदी कलाकार आयडियलच्या दहीहंडीत सहभागी झाले होते.
डबल डेकर ओपन बसमधून या टीमचे या दहीहंडी उत्सवात आगमन झाले. त्याचे तेथे जंगी स्वागत करण्यात आले. बाॅईज 3 चित्रपटातील कलाकार पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे, विदुला चौघुले, गायक व संगीतकार तसेच बाॅईज 3 चित्रपटाचे प्रेझेंटर अवधूत गुप्ते, दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी आयडियलबरोबरच प्रभादेवी मित्रमंडळ आदी ठिकाणच्या दहीहंडी उत्सवाला भेट दिली.
बोरिवली मागठाणे येथील दहीहंडी उत्सवाला अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती. अन्य कलाकारांनीही विविध दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.