मुंबई

आरपीएफवर आता जिओ टॅगद्वारे लक्ष!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: रेल्वेच्या स्थानकांत तैनात असणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलातील जवानांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या हातावर जिओ टॅग बांवण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्या जवानांवर लक्ष ठेवण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

रेल्वेस्थानकांत तैनात असणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलातील जवानांकडून प्रवाशांच्या सुरक्षेत हलगर्जी होऊ नये म्हणून जिओ टॅग प्रणाली राबवण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार आरपीएफ जवानाच्या हातावर जिओ टॅग बांधण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे प्रत्येक स्थानकाचा नकाशा तयार केला जाईल. हा नकाशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील स्क्रीनवर दिसेल. जिओ टॅग बांधलेल्या जवानाच्या हालचाली या पडद्यावर दिसतील. 

जिओ टॅग बांधलेला आरपीएफ जवान स्थानकातील आपली जागा सोडून अन्यत्र जात असल्यास तात्काळ समजेल. तसे झाल्यास संबंधित जवानाला नेमलेल्या ठिकाणी जाण्याची सूचना दिली जाईल. या प्रणालीमुळे कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्यांवर चाप लावण्यात येईल आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर व्यवस्थित लक्ष देता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

जिओ टॅग प्रणालीसाठी जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) आणि इंटरनेट नेटवर्क आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

या ठिकाणी अंमलबजावणी 
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते खोपोली, कसारा, लोणावळा, इगतपुरी या स्थानकांत जिओ टॅग प्रणालीची अंमलबजावणी केली जाईल. सध्या मध्य रेल्वेवर 1500 हून अधिक आरपीएफ जवान आहेत. सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि गर्दीच्या अन्य स्थानकांत जवानांची संख्या अधिक आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT