AU Small Finance Bank Period Leave from Work for women menstrual leave mumbai esakal
मुंबई

Menstrual leave : एयू स्मॉल फायनान्स बँकेची महिलांना मासिकपाळी रजा

एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेने आज आपल्‍या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी रजा देणार असल्याचे जाहीर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेने आज आपल्‍या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी रजा देणार असल्याचे जाहीर केले. बँकेतर्फे महिलांना अन्य रजांव्‍यतिरिक्‍त मासिक पाळी रजा धोरणांर्गत दर महिन्‍याला एक दिवसाची अतिरिक्‍त भरपगारी रजा दिली जाईल.

फेब्रुवारी महिन्यापासून या धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. महिलांना काम करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याच्या उद्दीष्ठाशी हे धोरण सुसंगत असल्याचे बँकेतर्फे जाहीर करण्यात आले.

इंडस्‍ट्री फर्स्‍ट इनिशिएटिव्‍ह म्‍हणून बँकेने तीन वर्षांच्‍या सेवेनंतर कंपनी सोडलेल्या कर्मचार्‍यांसाठी खास 'एयू फॉरेव्‍हर पास' देखील सुरू केला आहे. त्यानुसार नोकरी सोडलेल्या विशिष्ठ पात्र कर्मचाऱ्यांना पुन्हा बँकेच्या सेवेत येण्याची संधी मिळेल.

महिला कर्मचाऱ्यांसह सर्वच कर्मचाऱ्यांच्या गरजा जाणून घेणारी कार्यस्थळ संस्कृतीच सर्वसमावेशक असते. त्यामुळे मासिकपाळी रजेसारखी धोरणे कंपनीची संवेदनशीलता दाखवून महिला कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्माण करतील, असे बँकेचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी संचालक संजय अग्रवाल म्‍हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT